अजबच! देशाच्या सायबर सुरक्षा मंत्र्यांनी आयुष्यात कॉम्प्युटरच वापरला नाही
त्यामुळे सायबर सुरक्षेत विशेष अशा काही अडचणी येणार नाहीत.
सर्वासाधारणपणे देशाच्या जनतेची भावना असते की, देशाचा मंत्री मग तो कोणत्या का खात्याचा असेना, त्याला त्याच्या खात्याबाबत किमान ज्ञान असावे. पण, असे वास्तव नसेल तर? होय, जपानच्या सायबर सुरक्षा मंत्र्यांनी केवळ त्यांच्या सहकारीच नव्हे तर, देशाच्या जनतेलाही पेचात टाकले आहे. योशिटाका सेकुराडा असे या मंत्री महोदयांचे नाव आहे. नुकतेच त्यांनी सांगितले की, आपल्या संबंध आयुष्यात आपण कधीच कॉम्प्यूटर वापरला नाही. विशेष म्हणजे सेकुराडा यांनी ही माहिती कायदे बनविणाऱ्या समितीसमोर दिली. सेकुराडा यांच्या विधानानंतर विरोधकांनी टीकेच्या रुपात राडा केला नाही तरच नवल.
क्योडो न्यूज एसन्सीच्या हवाल्याने बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, सेकुराडा यांनी म्हटले आहे की, मी २५ वर्षांचा स्वतंत्र व्यक्ती होतो. मी आपल्या स्टाफ आणि सचिवांनाही सांगितले आहे की, मी माझ्या आयुष्यात कधीच कॉम्प्युटर वापरला नाही. ६८ वर्षांचे योशिटाका सेकुराडा यांनी गेल्याच महिन्यात सायबर सुरक्षा मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर २०२०मध्ये आयोजित केल्या गेलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेशी संबंधीत सायबर सुरक्षेची तयारी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
योशिटाका सेकुराडा यांच्या विधानानंतर विरोधी पक्ष डेमोक्रेटिक पक्षाचे नेते मसाटो एमाए यांनी योशिटाका यांच्या विधानावर प्रचंड आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांच्याच एका प्रश्नावर योशिटाका यांनी आपला आणि कॉम्पूयटरचा संबंध आला नसल्याच सांगितले होते. मसाटो यांनी म्हटले आहे की, मला आश्चर्य वाटते की, ज्या व्यक्तिकडे सायबर सुरक्षा मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या व्यक्तिचा आणि कॉम्प्यूटरचा संबंधच आलेला नसावा. त्यांनी आयुष्यात कधी कॉम्प्यूटर वापरलेला नसावा. (हेही वाचा, निर्बंध हटवा अन्यथा अणूबॉम्ब निर्मितीचा कार्यक्रम पुन्हा हाती घेऊ; उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा)
दरम्यान, विरोधकांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना योशिटाका यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे अनुभव नसला तरी, माझे सहकारी आणि अधिकारी यांना या क्षेत्रातील प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेत विशेष अशा काही अडचणी येणार नाहीत. त्यांच्या कारभार आणि मंत्रालयाबाबत चिंता तर तेव्हा निर्माण झाली जेव्हा, त्यांना विचारण्यात आले की, देशाच्या अणूउर्जा केंद्रांमध्ये यूएसबी ड्राईव्हचा (पेन ड्राईव्ह) वापर केला जातो. या प्रश्नाचे उत्तर देताना योशिटाका यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. अनेक प्रयत्न करुनही त्यांना उपस्थितांचे समाधान करता आले नाही. दरम्यान, आपल्या वक्तव्यामुळे योशिटाका सोशल मीडियावरही ट्रोल झाले आहेत.