जैश-ए-मोहम्मद संघटना भारतावर हल्ला करण्यासाठी देतेय बालाकोट येथे 27 दहशतवाद्यांना ट्रेनिंग
या तळात जवळजवळ 27 दहशतवाद्यांना भारतावर हल्ला करण्यासाठी ट्रेनिंग दिली जात असल्याची बाब समोर आली आहे.
पाकिस्तान मधील जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचे तळ बालाकोट (Balakot) येथे असून या ठिकाणी गेल्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात भारतीय वायूसेनेने उद्धवस्त करुन लावले होते. मात्र बालकोट येथे पुन्हा दहशतवादी संघटनेचे तळ सक्रिय झाले आहे. या तळात जवळजवळ 27 दहशतवाद्यांना भारतावर हल्ला करण्यासाठी ट्रेनिंग दिली जात असल्याची बाब समोर आली आहे. याबाबतची माहिती इंटलीजेंस आणि काउंटर टेरर ऑपरेटिव्ह यांच्याकडून देण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा जैशच्या संघटनेचे तळ सक्रिय झाल्याची माहिती देण्यात आली होती. गेल्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यानंतर भारतीय वायुसेनेने जैशच्या तळावर हल्ला करत याचा बदला घेतला होता.
बालाकोट येथील जैश या दहशतवादी संघटनेचे तळ मसूद अजहर याचा मुलगा युसूफ अजहर चालवत आहे. त्यासाठी बालाकोट येथे 27 दहशतवाद्यांना भारताविरुद्ध हल्ला करण्यासाठी ट्रेनिंग दिली जात आहे. ट्रेनिंग देण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांमधील आठजण हे पाकव्याप्त कश्मीर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानधील पंजाब मधील दोन आणि अफगाणिस्तान मधील तीन प्रशिक्षकांच्या द्वारे ट्रेनिंग देण्यात येत आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राइकवेळी जैशच्या तळात 300 दहशतवादी ट्रेनिंग घेत असल्याचे समोर आले होते.(बालाकोट एअरस्ट्राईक' चा व्हिडिओ जारी; पहा Indian Air Force ने कसा केला आतंकवाद्यांचा खात्मा)
दरम्यान 26 फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेकडून पाकिस्तान मधील बालकोट येथे एअर स्ट्राईक करण्यात आले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या पाकिस्तान कडून भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु राहिला आहे. तर जम्मू-कश्मीर येथून कलम 370 रद्द केल्यानंतर सुद्धा पाकिस्तानने संताप व्यक्त करत सीमारेषेवर गोळीबार करण्यास सुरुवात केली होती.