अलीबाबा कंपनीचा संस्थापक करणार हे काम...
तर, ती एका युगाची सुरूवात आहे.'
अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडचे अध्यक्ष आणि चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेले जॅक मा, हे आपल्या निवृत्तीबाबत विचार करत आहेत. अर्थात, जॅक मा यांनी म्हटले आहे की, मी निवृत्तीचा विचार करत असलो तरी, अलीबाबाच्या निर्देशक मंडाळावर कार्यरत असेन. कारण, या मंडळाच्या माध्यमातून मी समाजकार्याचे काम करत राहीन.
न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत जॅक मा यांनी म्हटले की, माझी सेवानिवृत्ती हा एका युगाचा अंत नाही. तर, ती एका युगाची सुरूवात आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, मला शिक्षण अतिशय प्रिय आहे. मी यापुढचा माझा अधिकाधिक वेळ आणि पैसा शिक्षणासाठी खर्च करेन दरम्यान, जॉक माने ब्लूमबर्गसोबत बोलताना म्हटले होते की, ते अब्जाधिश बिल गेट्स यांचे अनुकरण करतात. म्हणूनच ते आपल्या नावाची एक संस्था काढून आपले आयुष्य समाजकार्यासाठी समर्पीत करू इच्छितात. खास करून शिक्षण क्षेत्राकडे त्यांचे विशेष ध्यान आहे.
सन 2013मध्ये चीफ एक्सक्यूटिव्ह ऑफिसर पदाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते, ई-कॉमर्स, क्लाऊड कॉम्यूटरींग आदिंच्या माध्यमातून, हॉलीवूड चित्रपट निर्मिती आणि ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या 400 बिलियन डॉलरहून अधिक वित्तिय मूल्य असलेल्या कंपनीचा प्रमुख चेहरा आहेत. जॅक मा यांची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे. की, असे सांगितले जाते की, जॅक मा यांची चीनमधील अनेक घरांमध्ये अक्षरश: पूजा केली जाते. तुम्ही चीनमध्ये जाल तर तुम्हाला अनेक नागरिकांच्या घरात मा यांच्या प्रतिमा लावलेल्या दिसतील.
ब्लूमबर्गने दिलेल्या बिलियनॉयर इंडेक्सनुसार, मा यांची एकूण संपत्ती 40 बिलिय डॉलरपेक्षाही अधिक आहे. जॅक मा यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी 17 भागिदारांसोबत अलीबाबा समूहाची स्थापना केली. या समूहाच्या माध्यमातूनच त्यांनी व्यवसायात पदार्पण केले. आज या समूहाच्या जोरावरच चीनमधील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. अलीबाबाची वार्षिक कमाई सुमारे 250 युआन (40 कोटी डॉलर) इतकी आहे.
अलीबाबा समूहाने 'मिशन मिलयन बुक्स'च्या माध्यमातून यंदाच्या वर्षाखेरीस सुमारे 10 लाख पुस्तके दान करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही खर्चाविना ही पुस्तके शैक्षणिक संस्थांना वितरीत केली जातात. या योजनेसाठी सुमारे आठ लाख पुस्तके जमा केली असून, त्यापैकी या समूहाने सुमारे सात लाख पुस्तके दानही केली आहेत. सन 2016मध्ये अलीबाबाने ही योजना सुरू केली होती.