IPL Auction 2025 Live

Israel To Impose 3 Week Nationwide Lockdown: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने 'या' देशात दुसऱ्यांदा होणार लॉकडाऊन, परत बंद होणार देश

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने इस्त्रायलने (Israel) दुसऱ्यांदा देशव्यापी लॉकडाऊनची (Nationwide Lockdown) घोषणा केली आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करणारा इस्त्रायल हा पहिलाच देश आहे. येथे लोकांना घरापासून 500 मीटर पेक्षा अधिक लांब जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Lockdown (संग्रहित संपादित प्रतिमा)

Israel To Impose 3 Week Nationwide Lockdown: जगभरात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने इस्त्रायलने (Israel) दुसऱ्यांदा देशव्यापी लॉकडाऊनची (Nationwide Lockdown) घोषणा केली आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करणारा इस्त्रायल हा पहिलाच देश आहे. येथे लोकांना घरापासून 500 मीटर पेक्षा अधिक लांब जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, इस्त्रायलमध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. यासंदर्भात इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, लॉकडाऊनच्या निर्णयामुळे मोठी किंमत चुकवावी लागेल. आपण नियमांचे पालन केल्यास कोरोनावर मात करू शकतो. देशातील कोरोना चाचणीची संख्या वाढवण्यात आल्याचंही नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - COVID-19 Vaccine Update: Oxford-AstraZeneca च्या कोविड-19 वरील लसीच्या ट्रायल्सला युके मध्ये पुन्हा सुरुवात)

इस्त्रायलमध्ये लॉकडाऊनदरम्यान, सर्व हॉटेल-पब, दुकाने आणि रिक्रएशनल सुविधा बंद असणार आहेत. विशेष म्हणजे या काळात शाळादेखील बंद ठेवण्यात येणार आहेत. इस्त्रायलमध्ये आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने नेतान्याहू यांच्यावर टीका करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी नवे आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचं नेतान्याहू यांनी सांगितलं आहे. शनिवारी इस्त्रायलमध्ये 2,715 नवीन कोरोना प्रकरणे नोंदवण्यात आली.