Israel-Hezbollah War: इस्रायलने लेबनॉनमध्ये मोठा हवाई हल्ला; 3 मीडिया कर्मचारी ठार

बेरूतस्थित अल-मायादीन टीव्हीने सांगितले की, शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पत्रकारांमध्ये त्यांचे दोन कर्मचारी आहेत. अल-मायादीनने सांगितले की, कॅमेरा ऑपरेटर घसान नजर आणि ब्रॉडकास्ट टेक्निशियन मोहम्मद रिदा या हल्ल्यात ठार झाले.

Israeli Strike in Southern Lebanon (फोटो सौजन्य -X/@Reuters)

Journalists Killed In Israel Strike: इस्रायल लेबनॉन (Lebanon)मध्ये सातत्याने प्राणघातक हल्ले करत आहे. दरम्यान, दक्षिण-पूर्व लेबनॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तीन मीडिया कर्मचारी ठार (Journalists Killed) झाले आहेत. लेबनॉनच्या अधिकृत 'नॅशनल न्यूज एजन्सी'ने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. बेरूतस्थित अल-मायादीन टीव्हीने सांगितले की, शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पत्रकारांमध्ये त्यांचे दोन कर्मचारी आहेत. अल-मायादीनने सांगितले की, कॅमेरा ऑपरेटर घसान नजर आणि ब्रॉडकास्ट टेक्निशियन मोहम्मद रिदा या हल्ल्यात ठार झाले.

लेबनॉनच्या हिजबुल्लाह गटाच्या अल-मनार टीव्हीने सांगितले की, त्याचा कॅमेरा ऑपरेटर विसम कासिम हसबाया देखील या भागात झालेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पत्रकारांनी सांगितले की, हे लोक ज्या घरामध्ये झोपले होते त्या घराला थेट लक्ष्य करण्यात आले. (हेही वाचा -Israel-Hamas War: इस्रायलने घेतला नेतन्याहू यांच्या घरावरील हल्ल्याचा बदला; हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयावर केला हवाई हल्ला, 3 महत्त्वाच्या व्यक्तींचा मृत्यू)

दरम्यान, इस्त्रायली लष्करही हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहे. आत्तापर्यंत हमासचे अनेक कमांडर मारले गेले आहेत. या क्रमाने इस्रायलला पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. इस्रायली लष्कराने हमासच्या एका कमांडरला ठार केल्याचे म्हटले आहे. मारला गेलेला कमांडर गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. विशेष बाब म्हणजे या कमांडरने गाझा पट्टीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मदत संस्थेसाठीही काम केले होते. (हेही वाचा -Drone Attack On Benjamin Netanyahu's Home: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला; हिजबुल्लाहचा सर्वात धोकादायक पलटवार)

लेबनॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तीन मीडिया कर्मचारी ठार - 

इस्रायली लष्कराने हमास कमांडर मोहम्मद अबू एतिवीला ठार केल्याचे म्हटले आहे. अबू इतिवीचा इस्रायली नागरिकांच्या हत्या आणि अपहरणात सहभाग होता. अबू इतिवी हा हमासच्या सेंट्रल कॅम्प ब्रिगेडच्या अल-बुरीज बटालियनमध्ये नुखबा कमांडर होता आणि तो UNRWA (युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी) चा कर्मचारी होता, असेही लष्कराने म्हटले आहे.