Israel Attack on Syria: इस्रायलचा सीरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ला; 7 ठार, 20 हून अधिक जखमी

सीरियाची राजधानी दमास्कसजवळ इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात(Airstrike) महिला आणि लहान मुलांसह सात नागरिक ठार झालेत.

Photo Credit- X

Israel Attack on Syria: सीरियाची राजधानी दमास्कसजवळ इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात(Airstrike) महिला आणि लहान मुलांसह सात नागरिक ठार झालेत. तर 20 जण जखमी झाल्याची माहिती देशाच्या संरक्षण मंत्रालयाने(Israel Attack on Syria) दिली. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता, इस्त्रायलने क्षेपणास्त्रांनी दमास्कस ग्रामीण भागातील सय्यदा झैनाब परिसरातील निवासी इमारतींना लक्ष्य केले. (हेही वाचा:  Israel Attack Lebanon: उत्तर बेरूतमध्ये इस्रायली हवाई हल्ले; 20 जण ठार, 6 जखमी)

या हल्ल्यात खासगी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. ब्रिटन-आधारित युद्ध निरीक्षण सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने यापूर्वी नोंदवले आहे की, या भागात लेबनीज नागरिक आणि हिजबुल्लाह सदस्य असलेल्या निवासी इमारतीतील एका फ्लॅटवर हल्ला झाला. सीरियाच्या राजधानीच्या दक्षिणेला सय्यदा झैनाब हे शिया धर्माचे प्रमुख मंदिर आहे आणि पूर्वी इस्त्रायली हल्ल्यांचे ते लक्ष्य राहिले आहे.

लेबनॉन आणि उत्तर गाझामध्ये इस्रायली हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले. आयडीएफच्या म्हणण्यानुसार स्ट्राइकच्या तपशीलांचे पुनरावलोकन केले जात आहे. इस्रायलने अलिकडच्या वर्षांत सीरियामध्ये अनेक हवाई हल्ले केले आहेत. ज्यात इराणी लष्करी मालमत्ता आणि हिजबुल्लाला हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने शस्त्रे लक्ष्य केली आहेत. (हेही वाचा: Canadian PM Justin Trudeau: ‘सर्व हिंदू मोदी समर्थक...’; कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचे वक्तव्य; देशात खलिस्तानी असल्याची कबुली)

दरम्यान, इस्रायली सैन्याने काल उत्तर बेरूतमध्ये हवाई हल्ला केले. यात 20 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर या हल्ल्यात सहा जण जखमी झाले होते. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात हवाई हल्ले झाले त्या भागात हिजबुल्लाचे मोठे अस्तित्व आहे.