Monkeypox: मंकीपॉक्स हा व्हायरस खरोखरच Sexually Transmitted आहे का?
आतापर्यंत सुमारे 19 देशांमध्ये 131 जणांना या व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याची पुष्टी केली आहे. त्यापैकी 106 जणांना मंकीपॉक्स आजार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंकीपॉक्स (Monkeypox) या व्हायरसचे रुग्ण जगभरातील 19 देशांमध्ये आढळून आले आहेत. आतापर्यंत सुमारे 19 देशांमध्ये 131 जणांना या व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याची पुष्टी केली आहे. त्यापैकी 106 जणांना मंकीपॉक्स आजार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्लुमबर्गने याबाबत एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार अभ्यासकांचे म्हणने आहे की, जगभरामध्ये मंकीपॉक्स हा व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. हा प्रसार थांबवता येऊ शकतो असे सांगतानाच अभ्याककांनी दावा केला आहे की, या व्हायरसची सुरुवात स्पेन आणि बेल्जियम येथील रेव पार्टीतून झाली. रेव्ह पार्टीमध्ये झालेले असुरक्षित लैंगिक संबंध हेच या व्हायरसच्या प्रसाराचे मुख्य कारण मानले जात आहे. कोरोना व्हायरस महामारीच्या प्रादुर्भावातून अवघे जग हळूहळू सावरत आहे. असे असतानाच आणखी नवा व्हायरस जग कवेत घेऊ पाहात असेल तर ते अधिक गंभीर असल्याचे अभ्यासक सांगतात.
ज्येष्ठ फार्मा अॅनेलिस्ट सॅम फाजेली यांनी एका लाईव्ह ट्विटर स्पेस संवादात म्हटले की, मंकीपॉक्स हा एक निसर्ग अगणित विषाणू (Nature countless viruses) आहे. चिकनपॉक्स आणि स्मॉलपॉक्स प्रमाणेच हा एक ऑर्थोपॉक्स व्हायरस आहे. मंकीपॉक्स परंतू स्मॉलपॉक्स मुळे होणाऱ्या मृत्यूदराच्या प्रमाणात हा थोडासा कमी धोकादायक आहे. हा व्हायरस प्रामुख्याने पश्चिम अफ्रीकेत वेगाने परसरणारा व्हायरस वाटतो. सध्या तो अनेक देशांमध्ये आढळून आला असला तरी, 2003 मध्ये मंकीपॉक्सचे 71 रुग्ण आढळून आले होते. त्या वेळी हा व्हायरस प्रवासामुळे नव्हे तर घाना येथून मागवल्या गेलेल्या रोडेट्समुळे प्रादुर्भावीत झाला होता. (हेही वाचा, Monkeypox युरोपात 2 रेव्ह पार्टीमध्ये सेक्सद्वारा पसल्याचा खुलासा)
मंकीपॉक्स खरोखरच माकडांपासून आला?
दावा केला जात आहे की, मंकीपॉक्स हा व्हायरस माकडांपासून आला. परंतू, वास्तवात याची ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही. त्यासाठी त्याची सीक्वेसिंग करण्याची आवश्यकात असल्याचे सांगितले जाते आहे. दरम्यान, मंकीपॉक्स असे या व्हायरसला म्हटले जाते आहे. परंतू, तो माकडांपासून आला नाही. हा व्हायरस तेव्हाच लक्षात आला काही माकडांना याचा संसर्ग झाला आणि तो संसर्ग मानवाच्या निदर्शनास आला. हा एक प्रकारचा ऑर्थो पॉक्स व्हायरस असल्याने तो माकडांशिवाय इतरही प्राण्यांमध्ये आढळून येऊ शकतो. प्रामुख्याने उंदरांमध्ये. आता तो मानवांमध्येही आढळून आला आहे.
जगभरात मंकिपॉक्स व्हायरस आढळून आलेल्या लोकांमध्ये एक साम्य आहे की, ज्या लोकांनी असुरक्षीत लैंगिक संबंध ठेवले आहेत त्यांना प्रामुख्याने या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तसेच यातील बहुतांश लोक एलजीबीटी समूहातील होते. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की हा व्हायरस होमो सेक्स (Homosexual) संबंधित आजार आहे. इथे फक्त केवळ हा आजार कसा पसरला याबाबतच सांगण्या आले आहे. त्यामुळे या व्हायरसचा संसर्ग हेट्रोसेक्स (Hetrosexual) लोकांमध्येही आढळू शकतो. त्यामुळे हा आजार खरोखरच Sexually Transmitted आहे का? या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही रुपात सध्यातरी द्यावे लागते. अर्थात संशोधन अद्यापही सुरुच आहे.