US Attack On Iran: अमेरिकेचा इराणी आण्विक स्थळांवर संयुक्त हल्ला; Donald Trump यांची माहिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील इराणच्या अणुस्थळांवर संयुक्त अमेरिका-इस्रायल हवाई हल्ल्याची पुष्टी केली, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला. शांतता प्रस्थापित न झाल्यास ट्रम्पने अधिक कारवाईचा इशारा दिला.

US Attack On Iran: अमेरिकेचा इराणी आण्विक स्थळांवर संयुक्त हल्ला; Donald Trump यांची माहिती
Donald Trump | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Israel Iran Conflict: अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शनिवारी जाहीर केलं की, अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणमधील तीन महत्वाच्या अणुस्थळांवर हवाई हल्ले (US Military Strike) केले. फोर्डो, नतांझ आणि इस्फहान (Fordo Natanz Esfahan) येथील अणु कार्यक्रमांवर (Iran Nuclear Program) हा हल्ला झाला असल्याची माहिती ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून दिलेल्या भाषणात दिली. त्यांनी म्हटले की, थोड्या वेळापूर्वीच अमेरिकन सैन्याने इराणच्या अणु कार्यक्रमांवरील फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन प्रमुख केंद्रांवर अचूकतेने मोठे हल्ले केले. अमेरिका आणि इस्रायलने एकत्र टीम म्हणून काम केलं, ज्याप्रमाणे आजवर कधीच कोणी केलं नसेल.

अमेरिकेचा इराणला इशारा

राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याचं कौतुक करताना म्हटलं, आज रात्रीचा हल्ला अतिशय महत्त्वाचा होता. मी त्या महान देशभक्तांना अभिनंदन देतो ज्यांनी ती भव्य विमाने उडवली, आणि संपूर्ण अमेरिकन सैन्याला सलाम करतो. आशा आहे की पुन्हा अशा प्रकारे त्यांची गरज भासणार नाही. तसेच त्यांनी इराणला इशारा दिला, शांतता नसेल, तर इराणसाठी भीषण परिणाम होतील. गेल्या आठ दिवसांतील संकटांपेक्षा हे अधिक घातक ठरेल. अनेक लक्ष्ये अजून बाकी आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलं की फोर्डो या मुख्य ठिकाणी संपूर्ण बॉम्ब पेलोड टाकण्यात आला. हे अणुस्थळ पर्वताच्या खोबणीत बांधले गेलेले असून, ते संरक्षित मानले जाते. (हेही वाचा, Nobel Peace Prize 2026: डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाकिस्तानकडून शिफारस)

इस्त्रायलचा कथीत अणुकार्यक्रमावर स्थगित

शनिवारी, मिसूरीहून अमेरिकन B-2 स्टेल्थ बॉम्बर्स पश्चिमेकडे प्रस्थान करताना दिसले. हे विमाने GBU-57 Massive Ordnance Penetrator (MOP) म्हणजेच "बंकर बस्टर" बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहेत, जे 30,000 पौंड वजनाचे असून अशा सुरक्षित ठिकाणांचा नाश करू शकतात. ही कारवाई अमेरिकेला थेट इराणविरोधात सशस्त्र संघर्षात ढकलते आणि इस्रायलच्या अणु कार्यक्रम मोडीत काढण्याच्या प्रयत्नात अमेरिकेची थेट सहभागिता दर्शवते.

संवादाचा मार्ग बंद झाल्याचा दावा

या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले. ही कारवाई ट्रम्प यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या विधानाच्या विरोधात आहे. त्यांनी तेव्हा सांगितले होते की, इराण व इस्रायलमधील संघर्षाचे शांततेत समाधान होऊ शकते का, हे पाहण्यासाठी पुढील दोन आठवडे वाट पाहू. मात्र आता हा संवादाचा मार्ग बंद झाला आहे, असं मानलं जात आहे.

कच्चा तेलाचा वाहतूक मार्ग संकटात येण्याची शक्यता

इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांनी नुकतेच इशारा दिला होता की, कोणतीही अमेरिकन लष्करी कारवाई झाल्यास, ती इराणसाठी भरून न येणाऱ्या नुकसानास कारणीभूत ठरेल. या हल्ल्यानंतर इराणकडून प्रतिहल्ला होण्याची शक्यता अद्याप स्पष्ट नाही. मात्र, जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम करणारी शक्यता म्हणजे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत स्फोटके किंवा सागरी खाणी टाकल्यास. जगातील सुमारे 20% कच्च्या तेलाचा वाहतूक मार्ग या सामुद्रधुनीतून जातो.

डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावरुन माहिती

RBC Capital Markets चे जागतिक कमोडिटी रणनीती प्रमुख हेलिमा क्रॉफ्ट यांनी CNBC ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, आम्हाला रिपोर्ट मिळत आहेत की इराण जहाजांचे ट्रान्सपॉन्डर जोरदारपणे जॅम करत आहे. QatarEnergy आणि ग्रीसच्या शिपिंग मंत्रालयाने त्यांच्या जहाजांना या सामुद्रधुनीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. या हल्ल्यानंतर इतरही चेतावणी जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात 2015 च्या इराण अणु करारातून अमेरिका बाहेर काढली होती, असा दावा करत की हा करार अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आणि इराणला अणुशक्तीपासून परावृत्त करण्यासाठी अपुरा आहे. इस्रायलने नेहमीच इराणवर अण्वस्त्रे विकसित करत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, आतापर्यंत त्यांच्या कारवाया सीमित हत्याकांड किंवा सायबर हल्ल्यांपुरत्या मर्यादित राहिल्या होत्या.

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 08:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).