Nobel Peace Prize 2026: डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाकिस्तानकडून शिफारस
पाकिस्तानने 2026 सालच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत शिफारस केली आहे. 2025 मध्ये भारत-पाकिस्तान संघर्ष टाळण्यात ट्रम्प यांच्या भूमिकेला पाकिस्तानने निर्णायक म्हटले असून, भारताने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाचा इन्कार केला आहे.
Donald Trump Nobel Nomination: पाकिस्तान सरकारने माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची 2026 सालच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी (Nobel Peace Prize 2026) अधिकृत शिफारस केली आहे. 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या (India-Pakistan Crisis 2025) पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेली 'निर्णायक राजनैतिक भूमिका आणि नेतृत्व' यामुळे दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये होणारा संभाव्य संघर्ष टळल्याचे पाकिस्तानने (Pakistan) म्हटले आहे. इस्लामाबादच्या मते, ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील संभाव्य युद्ध रोखण्यास मदत झाली.
भारत सरकारकडून दाव्याचे खंडण
पाकिस्तान सरकारच्या सत्यापित सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आणि एक मोठा प्रादेशिक संघर्ष टळल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी देखील अनेक वेळा असा दावा केला आहे की त्यांनी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र भारत सरकारने या दाव्यांचे स्पष्ट खंडन केले असून, सर्व चर्चा पाकिस्तानच्या विनंतीवरून झाल्या असून कोणताही बाह्य हस्तक्षेप झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या फोन संवादातही हेच मत व्यक्त केले. (हेही वाचा, 'भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि स्वीकारणारही नाही' PM Modi यांनी US President Donald Trump यांना स्पष्ट सांगितल्याची Foreign Secretary Vikram Misri यांची माहिती)
पाकिस्तानचा कांगावा आणि आरोप
पाकिस्तानने मात्र सांगितले की, 'ट्रम्प यांनी त्या गंभीर क्षणी दोन्ही देशांशी थेट संवाद साधून दूरदृष्टी आणि प्रभावी नेतृत्व दाखवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शस्त्रसंधी झाली आणि गंभीर युद्ध टळले.' या संघर्षाची सुरुवात भारताकडून झालेल्या “अकारण आणि बेकायदेशीर आक्रमणामुळे” झाल्याचा दावा पाकिस्तानने केला असून, त्यामध्ये नागरी नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचेही म्हटले आहे. त्यानंतर पाकिस्तानने 'Operation Bunyan-un-Marsoos' हे ऑपरेशन राबवले, जे 'अचूक आणि मर्यादित लष्करी प्रतिकार' म्हणून वर्णन करण्यात आले आहे. या ऑपरेशनचा उद्देश म्हणजे प्रतिरोध पुन्हा स्थापित करणे आणि नागरिकांचे नुकसान टाळणे होता, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi Gifts G7 Summit: G7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जागतिक नेत्यांना भारतीय परंपरागत कलाकृती भेट (See Photo))
पाकिस्तानने सोशल मीडियावर काय म्हटले?
- तणाव वाढत असताना ट्रम्प यांच्या 'गुप्त संवादातून' (back-channel diplomacy) परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मदत झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
- 'हा हस्तक्षेप ट्रम्प यांना खऱ्या अर्थाने शांततेचा समर्थक सिद्ध करतो आणि संवादाच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे,' असे पाकिस्तान सरकारच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- इस्लामाबादने काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्यासाठी ट्रम्प यांनी दिलेल्या वारंवार ऑफर्सचेही कौतुक केले असून, त्याला 'दक्षिण आशियातील कायमस्वरूपी शांततेसाठी प्रामाणिक प्रयत्न' असे संबोधले आहे.
- 'जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीर प्रश्नाचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार निराकरण होणे अत्यावश्यक आहे,' असेही पाकिस्तान सरकारने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
जम्मू-कश्मीर मध्ये पहलगम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यात काही पर्यटक मारले गेले. हे कृत्य पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या माध्यमातून केले. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. ज्यामध्ये पाकिस्तानातीह अनेक दहशतवादी तळ उदद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु झाला.
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2025 09:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

