IPL Auction 2025 Live

Turkey Restores Instagram: नऊ दिवसांच्या स्थगितीनंतर टर्कीमध्ये इनस्टाग्राम पूर्ववत

सलग नऊ दिवसांच्या स्थगितीनंतर (Instagram Suspension) सेवा पूर्ववत झाल्याने खुद्द इन्स्टाग्राम आणि नेटीझन्सनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Instagram (PC - pixabay)

विविध विषयांबाबतच्या त्रूटी दूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे कंपनी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतरच टर्कीने (Turkey) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील स्थगिती मागे (Turkey Restores Instagram) घेतल्याचे समजते. पॉलेस्टाईनमधील हमास संघटनेचा नेता इस्माईल हनीह यांची राजकीय हत्या करण्यात आली. या हत्येचा तीव्र निषेध करणारी पोस्ट इन्स्टाग्रामने हटवली होती. त्यामुळे संतापलेल्या टर्कीने तत्काळ आणि थेट कारवाई करत इन्स्टाग्रामवर बंदी घातली होती. गाझा पट्टीत इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याचा टर्कीने तीव्र शब्दांत निशेष केला होता. तसेच, इस्त्राईलने पॅलेस्टाईनसोबत सुरु केलेले युद्ध तत्काळ थांबवावे अशी मागणी केली होती.

टर्कीमध्ये इन्स्टाग्राम वापरकर्त्यांची मोठी संख्या

दरम्यान, नऊ दिवसांच्या बंदीनंतर इन्स्टाग्राम मंचाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या लघू व्यवसायिकांकडून तसेच वापरकर्त्यांकडूनही तीव्र निषेध व्यक्त होऊ लागा. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर बरीच चर्चा झाली आणि मंचावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला गेला, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्राच्या आधारे दिले. इन्स्टाग्राम वापरकर्त्यांची संख्या पाहता टर्कीचा जगभरामध्ये पाचवा क्रमांक लागतो. या देशातील जवळपास 57 कोटी लोक हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात. टर्कीच्या आगोदर या मंचाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांमध्ये भारत, युनायटेड स्टेट्स, ब्राझील आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो, असे स्टेटसमनचा डेटा सांगतो. (हेही वाचा, Instagram Ban in Turkey: तुर्कीमध्ये इन्स्टाग्रामवर अचानक बंदी, हमास प्रमुख हनियाच्या हत्येनंतर कंपनीने ब्लॉक केला होता शोक संदेश)

मंत्र्यांची सोशल मीडियावर पोस्ट

टर्कीचे वातूक आणि पायाभूत सुविधा मंत्री अब्दुलकादीर उरालोग्लू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, इन्स्टाग्राम अधिकाऱ्यांनी टर्की सरकारसोबत संयुक्त विद्यमाने काम करण्याचे मान्य केले आहे. तसेच, वापरकर्त्यांवर लादलेल्या अटी आणि शर्तींवरही ते सरकारसोबत काम करणार आहेत तसेच, टर्कीचे कायदेही पाळणार आहेत. या वाटाघाटींचा सकारात्मक परिणाम म्हणून आम्ही ही स्थगिती मागे घेत आहोत. तुर्की कायद्यातील कॅटलॉग गुन्ह्यांमध्ये खून, लैंगिक अत्याचार, मादक पदार्थांची तस्करी, गैरवर्तन आणि छळ यासारख्या कृत्यांचा समावेश होतो. (हेही - Cyberattacks in India: भारतात डेटा भंगाचा विक्रमी उच्चांक, औद्योगिक क्षेत्र सर्वाधिक प्रभावित)

टर्कीचे कायदे पाळण्याचे इन्स्टाग्रामचे आश्वासन

तुर्कीमधील डिजिटल वातावरणात सुरक्षा, कायदेशीर अनुपालन, वापरकर्त्याच्या हक्कांचे संरक्षण आणि निष्पक्ष तपासणी यंत्रणा विकसित करण्यामध्ये लक्षणीय नफा प्राप्त झाला आहे, असे उरालोग्लू यांनी आपल्या पोस्टममध्ये म्हटले आहे. इंस्टाग्रामची स्वामित्व कंपनी मेटा यांनी तुर्की कायद्याचे पालन करण्यास आणि काही गुन्ह्यांचे घटक किंवा "दहशतवादाचा प्रचार" असल्यास पोस्ट आणि सामग्री कार्यक्षमतेने काढून टाकण्याची खात्री करण्यास सहमती दर्शविली होती, त्यानंतरच हा निर्णय घेतल्याचेही उरालोग्लू म्हणाले.