इंडोनेशिया सुनामी : भूकंपाच्या तडाख्यात 384 जणांचा मृत्यू

भुकंपाची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी होती. भुकंप झाल्यानंतर काही वेळातच सुनामीचा जोरदार फटका बसला. सुनामीमुळे समुद्रकिनाऱ्याजवळील इमारती आणि लोकवस्ती उद्धवस्त झाल्या.

इंडोनेशियातील भूकंप (Photo Credits: IANS)

जकार्ता : इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) ला भुकंपाचा जोरदार धक्का बसला. या भुकंपाची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी होती. भुकंप झाल्यानंतर काही वेळातच सुनामीचा जोरदार फटका बसला. सुनामीमुळे समुद्रकिनाऱ्याजवळील इमारती आणि लोकवस्ती उद्धवस्त झाल्या.

अचानक आलेल्या या आपत्तीमुळे लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले. या नैसर्गिक आपत्तीत 384 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या रिपोर्टनुसार, 6.0, 7.4 आणि 6.1 तीव्रतेचे भुकंपाचे हादरे बसले. त्यात 350 लोक जखमी झाले.

आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "जखमींना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसंच भुकंप आणि सुनामी पीडितांच्या मदतीला सैनिक, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे स्वयंसेवक धावून आले." इंडोनेशिया हा देश भुकंपप्रवण भागात असल्याने तिथे भूंकपाचे हादरे वारंवार बसत असतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now