Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानातील बाल्टिस्तान भागात प्रवासी बसवर अंदाधुंद गोळीबार, 9 जण ठार, 26 जखमी
दहशतवाद्यांनी (Terrorists) एका प्रवासी बसवर अंदाधुंद गोळीबार (Firing) केला. यात 9 जण ठार झाले असून 26 जण जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गिलगिटहून रावळपिंडीला जाणाऱ्या बसवर सायंकाळी साडेसहा वाजता चिलासजवळ हल्ला करण्यात आला.
Pakistan Terrorist Attack: पाकव्याप्त काश्मीरमधील (Pakistan-occupied Kashmir) गिलगिट बाल्टिस्तान (Gilgit-Baltistan) भागात शनिवारी दहशतवाद्यांनी (Terrorists) एका प्रवासी बसवर अंदाधुंद गोळीबार (Firing) केला. यात 9 जण ठार झाले असून 26 जण जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गिलगिटहून रावळपिंडीला जाणाऱ्या बसवर सायंकाळी साडेसहा वाजता चिलासजवळ हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. चिलासचे पोलिस उपायुक्त आरिफ अहमद यांनी सांगितले की, 9 मृतांपैकी पाच जणांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये बसमध्ये प्रवास करणाऱ्या दोन जवानांचा समावेश आहे. त्याचबरोबर जखमींमध्ये स्पेशल सिक्युरिटी युनिटच्या एका जवानाचा समावेश आहे.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेल्याचंही पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. गिलगिट-बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री हाजी गुलबर खान यांनी 'दहशतवादाच्या भ्याड कृत्याचा' निषेध केला आणि सांगितले की, या घटनेच्या तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून सखोल चौकशी केली जात आहे. (हेही वाचा - Firing in Las Vegas: लास वेगासमध्ये 5 बेघर लोकांवर गोळीबार, 2 ठार, (Watch Video))
सरकार या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना योग्य ती शिक्षा देईल. त्यांना पकडून कायद्यानुसार कोठडीत ठेवण्यात येईल आणि कठोर शिक्षा दिली जाईल. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सरकार आपली सर्व संसाधने वापरेल. प्रादेशिक सरकार या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व पावले उचलत असून कोणालाही ती तोडफोड करण्याची परवानगी दिली जाणार नाही. (हेही वाचा - Terrorists of Lashkar-e-Taiba Arrested: लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक; दोन आयईडी-हँड ग्रेनेड, डिटोनेटर-बॅटरी जप्त)
पाकिस्तानात दहशतवाद
तेहरीक-ए-तालिबान (TTP) ने गेल्या वर्षी सरकारसोबतचा युद्धविराम संपुष्टात आणल्यापासून पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या घटनांदरम्यान, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे अशा दहशतवादी कारवायांचे प्रमुख लक्ष्य बनले आहेत. पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीज (PICSS) च्या आकडेवारीनुसार, या वर्षी सप्टेंबरमध्ये देशभरात 99 हल्ले झाले, जे 2014 नंतर सर्वाधिक आहेत. या हल्ल्यांमध्ये 112 मृत्यू आणि 87 जखमी झाले आहेत. ज्यात मुख्यतः सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)