भारतीय वंशाच्या बॅरिस्टर Suella Braverman यांची युकेच्या नव्या Home Secretary पदी निवड
यंदा पहिल्यांदाच नव्या पंतप्रधानाची निवड Buckingham Palace ऐवजी स्कॉटलंड मधून राणीने केली आहे.
भारतीय वंशाच्या बॅरिस्टर Suella Braverman यांची युकेच्या नव्या Home Secretary पदी निवड करण्यात आली आहे. प्रिती पटेल या देखील भारतीय वंशाच्या त्यांच्या सहकार्याच्या जागी त्यांची निवड झाली आहे. युकेच्या नव्या पंतप्रधान Liz Truss यांनी त्यांची निवड केली आहे.Suella Braverman यांचा जन्म 3 एप्रिल 1980 साली झाला. त्यांची आई हिंदू तमिळ उमा आहे तर वडील गोव्याचे Christie Fernandes आहे. Suella यांची आई Mauritius मधून युकेला स्थलांतरित झाली तर वडील 1960 साली केनिया मधून युके मध्ये स्थलांतरित झालेले आहेत.
Suella Braverman या 2020-22 मध्ये Attorney General म्हणून काम करत होत्या. तसेच त्यांना पार्लमेंटरी अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट पदाचा देखील अनुभव आहे. Suella यांची Fareham साठी मे 2015 मध्ये Conservative MP म्हणून निवड झाली आहे. ब्रेव्हरमन या बौद्ध आहेत. त्या लंडनच्या बौद्ध केंद्रात नियमितपणे हजेरी लावतात आणि भगवान बुद्धांच्या शिकवणींची माहिती देणार्या "धम्मपद" वर त्यांनी संसदेत आपल्या पदाची शपथ घेतली आहे.
Queen Elizabeth II यांनी मंगळवारी Conservative Party leader Liz Truss यांची युनायटेड किंग्डमच्या नव्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. स्कॉटलंड त्यांची भेट देखील झाली आहे.
यंदा पहिल्यांदाच नव्या पंतप्रधानाची निवड Buckingham Palace ऐवजी स्कॉटलंड मधून राणीने केली आहे. 47 वर्षीय Liz Truss या युकेच्या तिसर्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांनी भारतीय वंशाच्या Rishi Sunak यांचा पराभव केला आहे. Liz Truss यांना 81,326 तर ऋषि सुनक यांना 60,399 मतं मिळाली आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)