Indian-Origin Man Shot Dead in Canada: कॅनडात भारतीय वंशाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, टार्गेट किलिंग प्रकरणी चौघांना अटक
अलीकडेच त्याला कॅनडाचा स्थायी निवासी (PR) दर्जा मिळाला होता. 28 वर्षीय युवराज सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. त्याचे वडील राजेश गोयल लाकडाचा व्यवसाय करतात.
Indian-Origin Man Shot Dead in Canada: पंजाबमधील लुधियाना (Ludhiana) येथील भारतीय वंशाच्या व्यक्तीची शुक्रवारी कॅनडातील (Canada) सरे येथे गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. पीडित युवराज गोयल 2019 मध्ये स्टुडंट व्हिसावर कॅनडाला आला होता. अलीकडेच त्याला कॅनडाचा स्थायी निवासी (PR) दर्जा मिळाला होता. 28 वर्षीय युवराज सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. त्याचे वडील राजेश गोयल लाकडाचा व्यवसाय करतात, तर त्याची आई शकुन गोयल गृहिणी आहे.
या प्रकरणाबाबत रॉयल कॅनेडियन पोलिसांनी सांगितले की, युवराजचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसून त्याच्या हत्येमागचे कारण तपासले जात आहे. ही घटना 7 जून रोजी सकाळी 8:46 वाजता घडली. सरे पोलिसांना ब्रिटीश कोलंबियातील सरे येथील 164व्या स्ट्रीटच्या 900-ब्लॉकमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांना युवराज मृत झाल्याचे आढळले. पोलिसांनी या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा -Mass Shooting in US: अमेरिकेच्या ओहायो प्रांतात गोळीबाराचा थरार; एक ठार, 26 जखमी (Watch Video))
संशयित, मनवीर बसराम (23), साहिब बसरा (20), आणि हरकिरत झुट्टी (23) आणि ऑन्टारियोचे केलोन फ्रँकोइस, (20) यांच्यावर शनिवारी हत्येचा आरोप ठेवण्यात आला. युवराजच्या हत्येमागील कारणांचा शोध सुरू असला तरी या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात गोळीबार लक्ष्य करून करण्यात आल्याचे समजते.