Indian-origin Family Die in Canada Fire: कॅनडामध्ये घराला लागलेल्या आगीत भारतीय वंशाचे जोडपे आणि अल्पवयीन मुलीचा मृत्यू

मृतांच्या जळालेल्या अवशेषांची शुक्रवारी ओळख पटली.

Fire, Death प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Indian-origin Family Die in Canada Fire: कॅनडा (Canada) च्या ओंटारियो प्रांतात (Province of Ontario) अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. एका भारतीय वंशाच्या जोडप्याचा (Indian-origin Couple) आणि त्यांच्या किशोरवयीन मुलीचा त्यांच्या घराला लागलेल्या आगीत मृत्यू (Death) झाला. ही घटना 7 मार्च रोजी घडली होती. परंतु अवशेषांची ओळख झाल्यानंतर शुक्रवारी या घटनेची नोंद करण्यात आली. हे कुटुंब ब्रॅम्प्टनच्या बिग स्काय वे आणि व्हॅन कर्क ड्राइव्ह परिसरात राहत होते.

वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, तपासकर्त्यांनी सांगितले की ते मृत लोकांची संख्या निश्चित करू शकले नाहीत. कुटुंबाच्या शेजाऱ्यांपैकी एकाने आगीची माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. आग विझवताना त्यांना घरात मानवी अवशेष सापडले. (हेही वाचा -Telangana Man Killed In Jet Ski Accident: अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय व्यक्तीचा जेट स्की अपघातात मृत्यू)

राजीव वारीकू (51), त्यांची पत्नी शिल्पा कोठा (47) आणि त्यांची मुलगी मेहक वारीकू (16) अशी मृतांची नावे आहेत. मृतांच्या जळालेल्या अवशेषांची शुक्रवारी ओळख पटली. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, पोलिस अद्याप आगीचे कारण शोधू शकले नाहीत आणि त्यांनी या घटनेला संशयास्पद मानलं आहे. (हेही वाचा -Indian Woman Murdered in Australia: भारतीय महिलेची ऑस्टेलियात हत्या, मृतदेह कचराकुंडीत आढळला)

एका प्रसिद्धीपत्रकात, पोलिसांनी सांगितले की ते कुटुंबातील तीन सदस्यांच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. या कुटुंबाविषयी कोणाला माहिती असेल त्यांनी पुढे येण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. ओंटारियो अग्निशमन विभागाने सांगितले की, ही आग अपघाती नव्हती. पोलीस प्रत्येक या प्रकरणाचा तपास करत आहेत.