COVID19 च्या लढाईसाठी भारताचे INS केसरी जहाज औषध आणि अन्य मदतीसाठी मॉरिशस मधील लुईस पोर्ट येथे दाखल
चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने आपले जगभरात जाळे पसरले आहे. तर अमेरिका, इटलीसह अन्य बड्या देशांत कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसागणिक त्याच्या रुग्णांसह बळींचा आकडा वाढत चालला आहे.
चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने आपले जगभरात जाळे पसरले आहे. तर अमेरिका, इटलीसह अन्य बड्या देशांत कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसागणिक त्याच्या रुग्णांसह बळींचा आकडा वाढत चालला आहे. तर अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोना व्हायरस हा नैसर्गिक नसून तो चीनच्या लॅब मधून तयार करण्यात आल्याचा वारंवार आरोप करत आहेत. तसेच येत्या वर्षाअखेरीस कोरोनावर लस आणू असा दावा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भारतात सुद्धा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सरकारकडून त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर आता भारताने कोविड19 च्या विरोधातील लढाईसाठी मॉरिशसला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताचे INS केसरी जहाज हे औषध आणि अन्य मदतीसाठी लुईस पोर्ट येथे दाखल झाले आहे.
भारताकडून कोविड19 संबंधित आणि नागरिकांसाठी आयुर्वेदिक औषधे मॉरिशसला पाठवण्यात आली आहे. भारताचे आयएनएस केसरी हे जहाज या सर्व गोष्टी घेऊन तेथे दाखल झाले आहेत. यापूर्वी सुद्धा भारताने अमेरिकेला हायड्रोक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा करत मदत केली होती. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार व्यक्त केले होते. तसेच अमेरिकेकडून भारताला मास्क आणि व्हेटिंलेटरची सोय करुन देण्यात येणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.(Coronavirus Outbreak: जगभरात तब्बल 53 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग; 3 लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू)
दरम्यान, कोरोना व्हायरसचे जगावर आलेले संकट कधी संपेल कोणालाच माहिती नाही. मात्र त्याच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक देशाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच वैज्ञानिकांकडून सुद्धा कोरोनावर लसी बाबत संशोधन केले जात आहे. भारतातील कोरोनाची परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास, एकूण 131868 जणांना त्याचे संक्रमण झाले आहे. तसेच 73560 जणांवर उपचार सुरु असून 3867 जणांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)