पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पैसे वाचवण्यासाठी अमेरिकेतील राजदूतांच्या घरी??
पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर असल्यास एक गोष्ट स्पष्ट केली आहे.
पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर असल्यास एक गोष्ट स्पष्ट केली आहे. तर इम्रान खान यांनी महागड्या आणि आलिशान हॉटेलमध्ये राहण्याऐवजी अमेरिकेतील राजदूतांच्या घरी राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबद्दल पाकिस्तान वृत्तपत्र डॉन यांनी ही माहिती दिली आहे.
21 जुलैपासून इम्रान खान तीन दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर येणार आहेत. तर अमेरिकेमधील पाकिस्तानी राजदूत असद मजीद खान यांच्या घरी राहिल्यास दौऱ्यासाठी होणारा खर्च कमी होईल असे म्हटले आहे. तसेच अमेरिकेत विशेष अतिथी आल्यास त्यांच्या सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटवर असते. त्याचसोबत या दौऱ्याचा वॉशिंग्टनच्या वाहतूकीवर परिणाम होणार नाही याचीसुद्धा काळजी त्यांना घ्यावी लागते.
पाकिस्तान सध्या आर्थिक मंदीतून जात आहे. त्याचसोबत दहशतवदी संघटनांना पाठीशी घालत आल्याने आर्थिक संस्थांकडून त्यांना मदत मिळवण्यासाठी अडथळे येत आहेत. तर इम्रान खान यांनी व्यक्त केलेली इच्छासुद्धा अर्थव्यवस्था सावरण्यामधील एक भाग असल्याचे बोलले जात आहे.