भारताशी पंगा घेणे पाकिस्तानला नडले; खर्च टाळण्यासाठी चहा-बिस्कीटांवर बंदी, नोकर भरती थांबली
यावर पहिला उपाय म्हणून फेडरल सरकारने नवीन नोकऱ्या उपलब्ध करून देण्यावर बंदी घातली आहे. असा निर्णय घेण्यात आला आहे की, विकास योजनांशिवाय इतर कोणत्याही कामांसाठी फेडरल सरकार नवीन रोजगार निर्माण करणार नाही.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या प्रचंड बिकट आहे. भारताशी व्यापार संबंध तोडल्यापासून पाकिस्तान अनेक समस्यांचा सामना करत आहे. या गोष्टींवर उपाय म्हणून आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारच्या तिजोरीकॅरील खर्च कमी करायचा निर्णय घेतला आहे. यावर पहिला उपाय म्हणून फेडरल सरकारने नवीन नोकऱ्या उपलब्ध करून देण्यावर बंदी घातली आहे. असा निर्णय घेण्यात आला आहे की, विकास योजनांशिवाय इतर कोणत्याही कामांसाठी फेडरल सरकार नवीन रोजगार निर्माण करणार नाही.
पाकिस्तान वृत्तपत्र ‘डॉन’ च्या वृत्तानुसार, इम्रान सरकारने दिवाळखोरीतून बाहेर पाडण्यासाठी अजून एक निर्णय घेतला आहे. सरकारी बैठकांवेळी दिल्या जाणाऱ्या चहा-बिस्कीट यांच्यावर बंदी घातली आहे. अशा बैठकांवेळी रिफ्रेशमेंट म्हणून जो चहा आणि बिस्किटे दिली जातात याच्यावर प्रचंड खर्च करण्यात येतो। या बंदीमुळे हा खर्च टाळण्यात येईल. अशा परिस्थितीत मधुमेह किंवा इतर आजारांशी झुंज देत असलेल्या अधिकाऱ्यांना काहीही न खाता तासनतास बैठकांमध्ये बसने अवघड ठरणार आहे. (हेही वाचा: पाकिस्तान FATF कडून 'ब्लॅक लिस्ट'; आर्थिक कोंडीमुळे 'कंगालिस्तान' होण्याची शक्यता)
पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ (Pakistan Tehreek-e-Insaf) सरकारने चालू आर्थिक वर्षात नवीन वाहन किंवा लक्झरी वस्तू न खरेदी करण्यासह अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये कपात केली आहे. सरकारने अधिकाऱ्यांसाठी एकापेक्षा जास्त वर्तमानपत्र आणि मासिकावरही बंदी घातली आहे. कागदाचा खर्च कमी करण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंना प्रिंट देण्याची सक्ती करण्यात येत आहे. दरम्यान, अहवालानुसार गेल्या तीन आर्थिक वर्षांत पाकिस्तानच्या परकीय कर्जात अनुक्रमे 6.82 अब्ज डॉलर, 4.77 अब्ज डॉलर आणि 6.64 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. हा आकडा 2015-16 ते 2017-18 मधील आहे.