कसा कमी होणार Covid-19 चा संसर्ग? जगात 10 पैकी 3 लोकांच्या घरी हात धुण्याच्या मूलभूत सुविधाच नाहीत- UNICEF

मात्र त्यानंतरही अनेक देशांमध्ये परिस्थिती अजूनही चांगली नाही'

Washing hands (Photo Credits: Pixabay)

गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीशी लढत आहे. या विषाणूपासून रक्षण करण्याच्या उपायांमध्ये वरचेवर साबणाने हात स्वच्छ धुणे (Hand Wash) हा एक उपाय सांगितला आहे. आता युनिसेफने (UNICEF) म्हटले आहे की, जागतिक स्तरावर दहा पैकी तीन लोकांच्या घरी हात धुण्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. युनिसेफने सांगितले आहे की, या लोकांकडे त्यांच्या घरी हात धुण्यासाठी पाणी आणि साबण नाही. कमी विकसित असलेल्या देशांमध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे, जिथे दहा पैकी सहा लोक मूलभूत सुविधांशिवाय राहत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेने, ‘ग्लोबल हँडवॉशिंग डे’ दिवशी ही माहिती दिली.

सध्याच्या अंदाजानुसार, जगभरातील पाचपैकी दोन शाळांमध्ये पाणी आणि साबणासह इतर मूलभूत स्वच्छता सेवा नाहीत, ज्यामुळे 818 दशलक्ष विद्यार्थी प्रभावित होत आहेत. त्यापैकी 462 दशलक्ष विद्यार्थी कोणत्याही सुविधांशिवाय शाळेत जात आहेत. 10 पैकी 7 देशांच्या शाळांमध्ये मुलांसाठी हात धुण्याची सुविधा नाही. जगभरातील एक तृतीयांश आरोग्य सुविधांमध्ये हाताची स्वच्छता ठेवण्याच्या सुविधा नाहीत. मात्र 2015 पासून यामध्ये सुधारणा होत आहे.

घरी मूलभूत स्वच्छतेच्या सुविधा असणारी जागतिक लोकसंख्या 5 अब्ज वरून 5.5 अब्ज किंवा 67 टक्क्यांवरून 71 टक्के झाली आहे. परंतु जर सध्याचा ट्रेंड असाच चालू राहिला तर दशकाच्या अखेरीस 1.9 अब्ज लोकांपर्यंत हाताच्या स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा पोहोचणार नाहीत. 2030 पर्यंत, जगातील सर्वात कमी विकसित देशांपैकी 46 देशांमधील सर्व घरांमध्ये हाताच्या स्वच्छतेच्या सुविधा पुरवण्याचा खर्च अंदाजे 11 अब्ज डॉलर आहे. (हेही वाचा: भारतातील COVID Vaccination चे वर्ल्ड बँकेकडून कौतुक)

युनिसेफ वॉशचे संचालक केली एन नायलर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाने जागतिक स्तरावर हातांच्या स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवली आहे. मात्र त्यानंतरही अनेक देशांमध्ये परिस्थिती अजूनही चांगली नाही. हाताच्या स्वच्छतेकडे कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठीची तात्पुरती तरतूद म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. पुढील आरोग्य संकटावर मात करण्यासाठी देखील या सुविधा महत्वाच्या आहेत.’



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif