Health Staff Cut Newborn's Head: धक्कादायक! प्रसृतीदरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कापले आईच्या पोटातील नवजात बाळाचे डोके

ज्यामुळे तिचा जीव वाचला. मुलाचे डोके आत अडकल्याने आईच्या गर्भाशयात दुखापत झाली, असं डॉक्टरांनी सांगितलं. महिलेचा जीव वाचवण्यासाठी तिचे पोट कापून बाळाचे डोके बाहेर काढावे लागले.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

Health Staff Cut Newborn's Head: पाकिस्तान (Pakistan) च्या सिंध प्रांतातील ग्रामीण आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनी वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणात नवजात बाळाचे डोके कापले. त्यामुळे 32 वर्षीय हिंदू महिलेचा जीव धोक्यात आला. या दुःखद घटनेनंतर, सिंध सरकारने घटनेच्या तळापर्यंत जाण्यासाठी आणि दोषींचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी मंडळाची स्थापना केली असून लवकरात लवकर चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानातील सिंध प्रांतात ही धक्कादायक घटना घडली आहे.

जामशोरो येथील लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्सेस (एलयूएमएचएस) च्या स्त्रीरोग विभागाचे प्रमुख प्रोफेसर राहिल सिकंदर म्हणाले, "पीडित हिंदू महिला ही थारपारकर जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यातील आहे. ती यापूर्वी तिच्या परिसरातील ग्रामीण आरोग्य केंद्रात (RHC) गेली होती. परंतु स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांने तिची प्रसूती सुरू केली. ज्यामुळे तिला खूप त्रास झाला. ते म्हणाले की, रविवारी झालेल्या शस्त्रक्रियेत आरएचसी कर्मचाऱ्यांनी मातेच्या पोटातील नवजात अर्भकाचे डोके कापून गर्भाशयात सोडले. (हेही वाचा - Pakistan: पाकिस्तानमध्ये महिला क्रिकेटपटूचा विनयभंग, राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक निलंबित, व्हिडीओच्या माध्यमातून करायचा ब्लॅकमेल)

आईच्या गर्भाशयाला दुखापत -

जेव्हा महिलेला जीवघेणा परिस्थितीचा सामना करावा लागला तेव्हा तिला मिठी येथील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्या उपचारासाठी कोणतीही सुविधा नव्हती. अखेरीस, तिच्या कुटुंबीयांनी तिला LUMHS येथे आणले, जिथे नवजात मुलाचे उर्वरित शरीर आईच्या गर्भातून काढून टाकण्यात आले. ज्यामुळे तिचा जीव वाचला. मुलाचे डोके आत अडकल्याने आईच्या गर्भाशयात दुखापत झाली, असं डॉक्टरांनी सांगितलं. महिलेचा जीव वाचवण्यासाठी तिचे पोट कापून बाळाचे डोके बाहेर काढावे लागले.

सिंध हेल्थ सर्व्हिसेसचे महासंचालक डॉ. जुमन बाहोटो यांना या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि महिला कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत काय झाले, हे चौकशी समित्या शोधून काढतील, असे ते म्हणाले. वैद्यकीय कर्मचार्‍यांनी महिलेचे फोटो का काढले आणि व्हिडीओ का बनवले, याचा अहवालही चौकशी समित्या पाहणार आहेत.