IDF On Wael Asafa: हमासचा कमांडर वेल असफा याची हत्या, इस्रायल डिफेन्स फोर्सेसचा दावा

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (Israel Defense Forces) ने मंगळवारी (7 नोव्हेंबर) दावा केला आहे की, त्यांनी 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या हमास कमांडर वेल असफाला (Hamas Commander Wael Asafa) ठार मारले आहे.

Wael Asafa (Photo Credit: X@IDF)

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (Israel Defense Forces) ने मंगळवारी (7 नोव्हेंबर) दावा केला आहे की, त्यांनी 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या हमास कमांडर वेल असफाला (Hamas Commander Wael Asafa) ठार मारले आहे. लष्कराने (IDF) एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. ज्यात म्हटले आहे की, “आयडीएफने हमासच्या देर अल-बलाह बटालियनचे कमांडर वेल असेफा याला आम्ही ठार मारले आहे. त्याने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायली नागरिकांवर हल्ले, अपहरण आणि हत्या करण्यासाठी हजारो दहशतवाद्यांना पाठवण्यासठी मदत केली.

एका स्वतंत्र निवेदनात , IDF ने असेही म्हटले आहे की शिन बेट अंतर्गत सुरक्षा सेवा आणि सैन्याकडून योग्य गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. ज्यात रविवारी केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा अतिरेकी मारला गेला. शिन बेटच्या म्हणण्यानुसार, असफाला 1992 ते 1998 दरम्यान इस्रायलविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी तुरुंगात टाकण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे, इस्रायलने गाझामध्ये आपले भू-आक्रमण तीव्र केल्यानंतर IDF ची घोषणा आली आहे.

ज्यू राष्ट्र असलेल्या इस्त्रायलने दावा केला आहे की, 27 ऑक्टोबर रोजी आक्रमण सुरू झाल्यापासून त्यांनीअनेक हमास अतिरेक्यांना ठार मारले आहे. तसेच, या गटाच्या महत्त्वपूर्ण गंभीर पायाभूत सुविधा देखील उद्ध्वस्त केल्या आहेत. आठवड्याच्या शेवटी, आयडीएफ आणि शिन बेटने हमासच्या साब्रा तेल Tel al-Hawa बटालियनचा कमांडर मुस्तफा दलुल याला ठार मारले.

एक्स पोस्ट

दरम्यान, इस्रायली ड्रोनने गाझामधील हमासचा नेता इस्माईल हनीयेह यांच्या घरावर 4 नोव्हेंबर रोजी क्षेपणास्त्र डागले. हानियेह, हा हमास गटाचा राजकीय प्रमुख आहे. तो 2019 पासून गाझा पट्टीच्या बाहेर आहे, तुर्की आणि कतार दरम्यान राहतो. दरम्यान, इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी बंकरमध्ये लपून बसलेल्या हमास नेता याह्या सिनवारला संपवण्याची शपथ घेतली आहे.