Gunmen Open Fire at Mexico Bar: मेक्सिको येथील बारमध्ये गोळीबार; 10 ठार, 7 जखमी
स्थानिक अधिकाऱ्यांनी एका संशयिताला अटक केली असून हल्ल्यामागील हेतूचा तपास करत आहेत.
Central Mexico Violence: मध्य मेक्सिको येथे अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात (Mexico Bar Shooting) तब्बल 10 जण ठार तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री क्वेरेटारो येथील लॉस कॅन्टारिटोस बारमध्ये (Los Cantaritos Attack) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार सशस्त्र बंदुकधाऱ्यांनी हा गोळीबार (Mass Shooting) केला. या चौघांपैकी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्यांनी हल्ला का केला याबाबत तपास सुरु आहे. स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील गजबजलेल्या सर्कनव्हॅलेशियन स्ट्रीटवर रात्री नऊ वाजता हा हल्ला झाला. गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही हल्लेखोर अचानक बारमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पलायन केले.
लॉस कॅन्टारिटोस बारमध्ये गोळीबार
शहराच्या सार्वजनिक सुरक्षा संस्थेचे प्रमुख जुआन लुईस फेर्रुस्का ऑर्टिझ यांनी घटनांचा तपशील देताना सांगितले की, "लॉस कॅन्टारिटोस बारमध्ये गोळीबार झाल्याची माहिती देणाऱ्या 911 आपत्कालीन कॉलद्वारे आम्हास माहिती मिळाली. माहिती मिळताच आमच्या अधिकाऱ्यांनी त्यास तत्काळ प्रतिसाद दिला. आमचे जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा चार व्यक्ती एका पिकअप ट्रकमध्ये लांब बंदुकांसह आल्या असल्याचे आढळून आले. या सर्वांची प्राथमिक ओळख पटली आहे. (हेही वाचा, Nigeria: नायजेरियामध्ये माध्यमिक विद्यालयावर बंदूकधार्यांचा हल्ला; तब्बल 400 विद्यार्थी बेपत्ता, तपास सुरु)
गोळीबारामुळे परिसरात घबराट
हल्लेखोर ज्या वाहनातून पळाले ते वाहन तपासण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पोलिसांना ते वाहनही आढळून आले. मात्र, हे वाहन पोलिसांना अर्धवट जळालेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. ऑर्टिझने पुष्टी केली की एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे, जरी त्यांच्या सहभागाची चौकशी सुरू आहे. मेक्सिको सिटीच्या वायव्येस अंदाजे 110 मैल (179 किलोमीटर) अंतरावर असलेल्या क्वेरेटारोमध्ये मेक्सिकोच्या इतर प्रदेशांच्या तुलनेत गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. पण या घटनेनेंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अद्यापही तपास करत आहेत. त्यामुळे हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.