Global COVID-19 Update: जगभरात कोविड-19 संसर्गामुळे तब्बल 638,243 रुग्णांचा मृत्यू; पहा कोरोना बाधितांच्या संख्येनुसार देशांची क्रमवारी

कोविड-19 संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होत असूनही कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 1.56 कोटी इतका झाला असून मृतांची संख्या 638,000 इतकी झाली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या संकटाने जगातील अनेक देश ग्रासले आहेत. कोविड-19 संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होत असूनही कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 1.56 कोटी इतका झाला असून मृतांची संख्या 638,000 इतकी झाली आहे. युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) यांच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, शनिवार 25 जुलै रोजी कोरोना बाधितांचा आकडा 15,668,380 इतका आहे. तर एकूण 638,243 मृतांची नोंद झाली आहे.

CSSE च्या आकडेवारीनुसार, कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेल्या अमेरिकत एकूण 4,106,346 रुग्ण आहेत. तर एकूण 145,333 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगात ब्राझीलचा दुसरा कर्मांक लागतो. सध्या ब्राझीलमध्ये एकूण 2,287,475 कोरोना बाधित रुग्ण असून 85,238 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 1336861 वर पोहचला असून 31358 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी:

अमेरिका 4,106,346
ब्राझील 2,287,475
भारत 1,336,861
रशिया 799,499
दक्षिण आफ्रिका 421,996
पेरु 375,961
मेक्सिको 378,285
चिली 341,304
ब्रिटन 299,500
इराण 286,523
पाकिस्तान 270,400
स्पेन 272,421
इटली 243,736
सौदी अरेबिया 262,772
इटली 245,590
तुर्की 224,252
फ्रान्स 211,943
जर्मनी 205,623
बांग्लादेश 218,658
कोलम्बिया 226,373
अर्जेंटीना 153,520
कॅनडा 115,115
कतार 108,638
इराक 104,711

10,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये ब्रिटन (45,762), मेक्सिको (42,645), इटली (35,097), भारत (30,601), फ्रान्स (30,195),  स्पेन (28,432), इराण (15,289), पेरु (17,843) आणि रशिया (13,026) यांचा समावेश आहे. दरम्यान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीच्या दिलासादायक माहितीमुळे संपूर्ण जगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.