IPL Auction 2025 Live

Global COVID-19 Update: जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 2 कोटींहून अधिक; एकूण 769,652 रुग्णांचा मृत्यू

दिवसागणित कोरोना बाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढत आहे. आजही त्यात भर पडली असून जगतील करोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटींच्या पार गेला आहे.

Coronavirus | ( Photo Credit: Pixabay.com )

जगातील अनेक देश कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहेत. दिवसागणित कोरोना बाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढत आहे. आजही त्यात भर पडली असून जगतील करोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटींच्या पार गेला आहे. तर एकूण 76900 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिली आहे. शनिवारी सकाळपर्यंत जगातील कोरोना बाधितांचा आकडा 21,377,367 इतका झाला असून 769,652 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) कडून देण्यात आली आहे.

CSSE च्या आकडेवारीनुसार, कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेल्या अमेरिकत एकूण 5,529,789 कोरोना बाधित असून मृतांचा आकडा 169,463 इतका आहे. या क्रमावारीत ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये 3,317,096 कोरोना बाधित असून 107,232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (भारताचा कोविड-19 मृत्यू दर 2% हून कमी; एकूण मृतांचा आकडा 49,980- आरोग्य मंत्रालय)

कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी:

अमेरिका 5,529,789
ब्राझील 3,317,096
भारत 2,526,192
रशिया 915,808
दक्षिण आफ्रिका 583,653
पेरु 516,296
मेक्सिको 517,714
चिली 383,902
ब्रिटन 319,208
इराण 341,070
पाकिस्तान 288,047
स्पेन 342,813
इटली 243,736
सौदी अरेबिया 297,315
इटली 253,438
तुर्की 248,117
फ्रान्स 252,965
जर्मनी 224,488
बांग्लादेश 274,525
कोलम्बिया 445,111
अर्जेंटीना 289,100
कॅनडा 123,788
कतार 114,809
इराक 172,583
इंडोनेशिया 137,468
फिलिपिन्स 157,918
कझाकस्तान 102,287
इक्वाडोर 100,688

10,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये मेक्सिको (42,645), भारत (49980), युके (46,791), इटली (35,392), फ्रान्स (30,410), स्पेन (28,617), पेरु (25,856), इराण (19,492), रशिया (15,585), कोलंबिया (14,492), साऊथ आफ्रिका (11,677) आणि चिली (10,395) यांचा समावेश आहे. दरम्यान अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या लसी विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. त्यामुळे या संकटात एक आशेचा किरण दिसत आहे.