Global COVID-19 Update: जगभरात एकूण 2.8 कोटींहून अधिक कोरोना बाधित; कोविड-19 संसर्गामुळे तब्बल 908,017 रुग्णांनी गमावले प्राण
कोरोना व्हायरसवर ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणित मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) जागतिक आरोग्य संकटाने अनेक देशांना जेरीस आणले आहे. कोरोना व्हायरसवर ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणित मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिलेल्या माहितीनुसार, जगातील कोरोना बाधितांचा आकडा 2.8 कोटींहून अधिक झाला आहे. तर एकूण 908,000 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार सकाळपर्यंत जगातील कोरोना बाधितांचा आकडा 28,054,396 वर पोहचला होता. तर एकूण 908,017 मृतांची नोंद झाली होती. अशी माहिती माहिती युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) कडून देण्यात आली आहे.
सीएसएसई नुसार, कोरोना बाधितांच्या क्रमवारीत अमेरिका प्रथमस्थानी आहे. अमेरिकेत आतापर्यंत 6,395,904 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 191,753 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4562415 इतकी झाली असून 75,062 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
CSSE च्या आकडेवारीनुसार, 4,238,446 कोरोना बाधित रुग्णांसह ब्राझील देश या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर रशिया 1,042,836, पेरू 702,776, कोलम्बिया 686,851, मॅक्सिको 652,364, दक्षिण अफ्रीका 644,483, स्पेन 554,143, अर्जेंटीना 524,198, चिली 428,669, इराण 395,488, फ्रान्स 392,243, ब्रिटेन 360,534, बांग्लादेश 332,970, सौदी अरेबिया 323,720, पाकिस्तान 299,949, तुर्की 286,455, इटली 283,180, इराक 278,418, जर्मनी 258,149, फिलिपिन्स 248,947, इंडोनेशिया 207,203, यूक्रेन 149,146, इज्राईल 45,526, कॅनडा 136,956, बोलिविया 124,205, कत्तार 121,052, इक्वाडोर 113,206, कजाकिस्तान 106,661, डोमिनिकन गणराज्य 101,716 आणि मिस्र 100,557 अशी क्रमवारी आहे.
दरम्यान 10 हजार पेक्षा अधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये ब्राजील 129,522, मॅक्सिको 69,649, ब्रिटेन 41,697, इटली 35,587, फ्रान्स 30,819, पेरू 30,236, स्पेन 29,699, इराण 22,798, कोलंबिया 22,053, रशिया 18,207, दक्षिण अफ्रीका 15,265, चिली 11,781, अर्जेंटीना 10,907 आणि इक्वाडोर 10,749 या देशांचा समावेश आहे. (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोविड-19 वरील लसीच्या ट्रायल्सच्या स्थगितीनंतरही या वर्षाअखेरपर्यंत लस तयार होण्याची शक्यता; अॅस्ट्राझेनेका सीईओ Pascal Soriot)
कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने कोरोनावरील लसीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जगभरात एकूण 180 लसी विकसनाच्या विविध टप्प्यात असून त्यापैकी 35 लसींच्या मानवी चाचण्या सुरु असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस (Tedros Adhanom) यांनी सांगितले आहे. दरम्यान अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड लसीच्या ट्रायल्स युकेमध्ये थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतातही सीरम इंस्टीस्ट्युटने कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.