Global COVID-19 Cases: जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 75 लाखांच्या पार तर सुमारे 4.2 लाख रुग्णांचा मृत्यू
जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 75 लाखांच्या पार गेला असून सुमारे 421000 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला हादरुन टाकले आहे. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 75 लाखांच्या पार गेला असून सुमारे 421000 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत जगभरात 7,500,777 कोरोना बाधित असून 420,993 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) यांच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार देण्यात आली आहे.
CSSE नुसार जगभरात कोरोना बाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा याबाबीत अमेरिका प्रथमस्थानी आहे. अमेरिकेत 2,022,488 कोरोना बाधित रुग्ण असून 113,803 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 802,828 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसह ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. (धक्कादायक! भारतात नव्या COVID-19 रुग्णांच्या संख्येने पार केला 10 हजारांचा टप्पा, देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,97,535 वर)
CSSE च्या आकडेवारीनुसार, रशिया( 2,92,860), भारत (2,86,605), स्पेन (2,42,707), इटली (2,36,142), पेरू (2,14,788), फ्रान्स (1,92,493), जर्मनी (1,86,691), इराण (1,80,156), तुर्की (1,74,023), चिली (1,54,092), मॅक्सिको (1,33,974), पाकिस्तान (1,25,933) आणि सौदी अरेबिया (1,16,021) अशी कोरोनाग्रस्तांची संख्या आहे.
कोविड-19 च्या संसर्गामुळे झालेला मृतांचा आकडा हा अमेरिकेमध्ये सर्वाधिक असून युके मध्ये ही संख्या 41,364 इतकी आहे. त्यातही युरोपमध्ये मृतांचा आकडा अधिक आहे. त्यानंतर ब्राझील (40,919), इटली (34,167), फ्रान्स (29,349), स्पेन (27,136) आणि मॅक्सिको (15,944) या देशांचा क्रमांक लागतो.