German Woman Donated 55 Crores: शेजारणीची कृपा, रातोरात बनला करोडपती; जर्मन महिलेने दान केले 55 कोटी रुपये
साधारण 2020 च्या एप्रिलमध्ये जिल्हा प्रशासनाने माहिती दिली की, रेनेट वेडेल यांनी आपल्या संपत्तीचा वारसदार निवडला होता. यात बँकेतील एकूण रक्कम, शेअर्स आणि इतर काही स्थावर आणि जंगम मालमत्ता दान करण्याबाबतचा तपशील होता.
एका शेजारणीमुळे एका शेजाऱ्याचे नशीब भलतेच फळफळले आहे.होय, 'शेजारणीची कृपा' इतकी बळकट की त्यामुळे शेजारी चक्क करोडपती (Millionaire Status) झाला. ही घटना एका जर्मन महिलेमुळे (German Woman) घडली आहे. या महिलेने आपल्या शाजाऱ्याला 7.5 मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमद्ये तब्बल 55.35 कोटी रुपयांची संपत्ती दान केली. रेनेट वेडेल (Renate Weddell ) असे या महिलेचे नाव आहे. वाल्डसोल्मस जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रेनेट वेडेल ही महिला वाइपरफेल्डेन (Weiperfelden Districts) जिल्ह्यात आपला पती अल्फ्रेड वीडेल यांच्यासोबत 1975 पासून राहात होती. अल्फ्रेड हे स्टॉक एक्सचेंज व्यवसायात होते. या व्यवसायात ते अत्यंत यशस्वी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात होते. सन 2014 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून रेनेट वेडेल एकटीच राहात असे. त्यात 2016 पासून तिची प्रकृती बिघडली. तिच्यावर फ्रँकफर्ट येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, वयाच्या 81 व्या वर्षी डिसेंबर 2019 मध्ये तिचा मृत्यू झाला. मग त्यांनी आपली संपत्ती शेजाऱ्याच्या नावावर केली. (हेही वाचा, PPF मध्ये पैसा गुंतवून करोडपती होण्याची संधी; पाहा काय आहे फंडा)
साधारण 2020 च्या एप्रिलमध्ये जिल्हा प्रशासनाने माहिती दिली की, रेनेट वेडेल यांनी आपल्या संपत्तीचा वारसदार निवडला होता. यात बँकेतील एकूण रक्कम, शेअर्स आणि इतर काही स्थावर आणि जंगम मालमत्ता दान करण्याबाबतचा तपशील होता. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रेनेट यांनी आपल्या बहिणीला आपला वारसदार म्हणून निवडले होते. परंतू, रेनेट यांच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला.
स्थानीक मेयर बर्नेड हेनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हे वृत्त ऐकून आम्हाला धक्का बसला. आम्ही पहिल्यांदा विचार केला की हे शक्य नाही. सुरुवातीला आम्हाला वाटले की मृत्यूपत्रात काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असाव्यात. किंवा काही काही कायदेशीर अडथळे असावेत. परंतू, सर्व बाबी तपासल्यानंतर पुढे आले की खरोखरच असे घडले आहे. रेनेट वेडेल यांनी आपल्या शेजाऱ्याला करोडपती केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)