Right to Abortion: गर्भपात हा महिलांना घटनात्मक अधिकार देणारा France ठरला जगातला पहिला देश!
फ्रान्समध्ये 1975 पासून गर्भपात कायदेशीर आहे, परंतु मतदानानुसार सुमारे 85% जनतेने गर्भपात अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी घटनादुरुस्तीचे समर्थन केले आहे.
महिलांना गर्भपात (Abortion) करण्याचा घटनात्मक अधिकार (Constitutional Right) देणारा फ्रान्स (France) हा जगातील पहिला देश ठरला आहे. फ्रांस मध्ये संविधानात आता गर्भपाताच्या अधिकाराला समाविष्ट करण्यात आले आहे. फ्रांस मध्ये या निर्णयाचे एकीकडे स्वागत करत त्याला ऐतिहासिक निर्णय म्हटलं जात आहे तर गर्भपात विरोधी असलेल्या लोकांकडून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. फ्रान्सच्या संसदेच्या संयुक्त सभागृहात गर्भपाताच्या अधिकाराशी संबंधित विधेयकाच्या बाजूने 780 तर विरोधात 72 मतं पडली. या निर्णयानंतर मध्य पॅरिसमध्ये गर्भपात हक्क कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्याचे निर्णयाचं स्वागत केले आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांनी आपण महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देण्याचे आश्वासन दिले होते. आता हे वचन पूर्ण झाले आहे म्हणत या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे. "French pride" असा या निर्णयाचा उल्लेख करत आपण एक वैश्विक संदेश दिला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिका आणि इतर देशांच्या तुलनेत फ्रान्समध्ये गर्भपाताच्या अधिकारांबाबत अधिक जागरूकता आहे. सर्वेक्षणानुसार, फ्रान्समधील सुमारे 80 टक्के लोकांनी गर्भपाताला कायदेशीर अधिकार देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. फ्रान्सचे पंतप्रधान Gabriel Attal
यांनी या विधेयकावर मतदान करण्यापूर्वी प्रतिक्रिया देताना, 'आम्ही सर्व महिलांना संदेश देत आहोत की शरीर तुमचे आहे आणि त्याचे काय करायचे ते इतर कोणीही ठरवणार नाही.' France's Youngest, First Gay PM: Gabriel Attal बनले फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान; अवघ्या 34 व्या वर्षी स्वीकारणार देशाचा भार .
फ्रान्समध्ये 1975 पासून गर्भपात कायदेशीर आहे, परंतु मतदानानुसार सुमारे 85% जनतेने गर्भपात अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी घटनादुरुस्तीचे समर्थन केले आहे. आधुनिक फ्रान्स मधील ही 25 वी घटनादुरूस्ती आहे तर 2008 नंतर ही पहिलीच घटनादुरूस्ती आहे. या निर्णयानंतर काल फ्रान्स मध्ये आयफेल टॉवर खाली महिलांनी "My Body My Choice" म्हणत सेलिब्रेशन केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)