इटलीचे माजी पंतप्रधान Silvio Berlusconi यांनी आपल्या 33 वर्षीय प्रेयसीसाठी सोडली 900 कोटींची रक्कम; मृत्यूपत्र पाहुल व्हाल थक्क

2013 मध्ये ते एका सेक्स स्कँडलमध्ये अडकले होते. यासोबतच त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि कर हेराफेरीचेही आरोप झाले होते. गेल्या काही बर्लुस्कोनी आजारी होते.

Silvio Berlusconi 9संग्रहित संपादित प्रतिमा)

इटलीचे दिवंगत माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी (Former Italian Prime Minister Silvio Berlusconi) यांचे मृत्यूपत्र चर्चेत आहे. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात 33 वर्षीय गर्लफ्रेंड मार्टा फासीनासाठी (Marta Fascina) 100 मिलियन युरो म्हणजेच 906 कोटी रुपये मागे सोडले आहेत. बर्लुस्कोनी यांचे गेल्या महिन्यात वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. सिल्वियो बर्लुस्कोनी हे मीडिया टायकून आणि राजकारणी होते. याशिवाय ते तीन वेळा इटलीचे पंतप्रधान राहिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बर्लुस्कोनीच्या साम्राज्याची किंमत 6 अब्ज युरोपेक्षा जास्त आहे. फोर्झा इटालियाच्या डेप्युटी मार्टा फासीना आणि बर्लुस्कोनी यांच्यातील संबंध 2020 मध्ये सुरू झाले. दोघांचेही कायदेशीर लग्न झाले नव्हते. पण, बर्लुस्कोनी हे मार्टाला आपली पत्नी समजत होते.

याआधी 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून 33 वर्षीय मार्टा इटलीच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाची सदस्या आहे. ती फोर्झा इटालियाचीही सदस्य आहे. फोर्झा इटालियाची स्थापना बर्लुस्कोनी यांनी 1994 मध्ये केली, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला.

मृत्युपत्रात मार्टाला कोट्यावधी रुपये मिळाले असतील, परंतु त्यांची दोन मुलेच माजी पंतप्रधानांचा व्यवसाय सांभाळत आहेत. या प्रकरणात, मरीना आणि पिअर सिल्व्हियो या दोन्ही मुलांचा 53 टक्के हिस्सा असेल. याशिवाय बर्लुस्कोनी यांनी आपल्या मृत्यूपत्रात भावालाही स्थान दिले आहे. त्यांनी त्यांचा भाऊ पाओलोसाठी 100 दशलक्ष युरो आणि फोर्झा इटालिया पक्षाचे माजी खासदार मार्सेलो डेल'उत्रीसाठी 30 दशलक्ष युरो मागे सोडले आहेत.

बर्लुस्कोनी यांचे नाव अनेकवेळा वादात सापडले आहे. 2013 मध्ये ते एका सेक्स स्कँडलमध्ये अडकले होते. यासोबतच त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि कर हेराफेरीचेही आरोप झाले होते. गेल्या काही बर्लुस्कोनी आजारी होते. बर्लुस्कोनी यांच्यावर गेल्या सहा आठवड्यांपासून मिलान येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. याआधी कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये त्यांना 11 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एप्रिल 2023 मध्ये, डॉक्टरांनी उघड केले की, ते ल्युकेमिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गाने ग्रस्त आहे. (हेही वाचा; PUBG गेम आणि प्रेम प्रकरण: बायको, मुलांसह परत पाठवा; पाकिस्तानी नागरिकाचे मोदी सरकारला साकडे)

बर्लुस्कोनी हे तीन वेळा इटलीचे पंतप्रधान होते. सर्वप्रथम, 1994 मध्ये बर्लुस्कोनी प्रथमच इटलीचे पंतप्रधान झाले. त्यानंतर 2001 ते 2006 पर्यंत ते इटलीचे पंतप्रधान होते. 2008 मध्ये ते पुन्हा सत्तेवर आले पण कर्जाच्या संकटामुळे त्यांना 2011 मध्ये राजीनामा द्यावा लागला आणि ते राजकारणापासूनही दूर झाले. मात्र, 2017 मध्ये त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश केला.