पाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही
त्यांच्या या फोटोमुळे पाकिस्तान मध्ये शरीफ यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
माजी पंतप्रधान मंत्री नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियात खुप व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोमुळे पाकिस्तान मध्ये शरीफ यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. इमरान खान यांच्या मंत्र्यांपासून ते प्रत्येक नेत्याकडून नवाज शरीफ यांच्यावर निशाणा साधत आहेत. सत्तारुढ पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पार्टीमधील काही मंत्र्यांनी नवाज शरीफ यांना देशद्रोही ठरविले आहे. लोक असे म्हणत आहेत की, शरीफ यांना दुश्मनांसोबत मैत्री करण्याची सवय आधीपासूनच आहे. सर्वात प्रथम पाकिस्तानात शरीफ यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात असून यामागील नेमके कारण काय आहे हे जाणून घ्या.
नवाज शरीफ यांचा फोटो अफगाणिस्तानचे नॅशनल सिक्युरिटी काउंसिल यांनी ट्विट केला आहे. तर अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब (Hamdullah Mohib) हे नवाज शरीफ यांच्या सोबत दिसून येत आहेत. या दोघांची बैठक लंडन येथे झाली. या दरम्यान, पीस मिनिस्टर सैय्यद सादत नादेरी सुद्धा होते. या फोटोसोबत असे म्हटले गेले आहे की, या बैठकीत एकमेकांच्या हितासंदर्भात चर्चा झाली. नवाज शरीफ हे नोव्हेंबर 2019 पासून उपचाराच्या कारणास्तव लंडल येथे राहत आहेत.(Pakistan आणि Uzbekistan बनवणार पहिला मुघल शासक 'जहीरुद्दीन बाबर'वर भव्य चित्रपट; PM Imran Khan यांची घोषणा)
Tweet:
ट्विटरवर नवाज शरीफ हे ट्रेंन्ड होऊ लागल्यानंतर काही लोकांनी त्यांच्या समर्थनात ट्विट केले. मात्र काहींनी त्यांच्या विरोधात टीका केली. पाकिस्तानचे सूचना मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी शरीफ यांचा हा फोटो पाहता संपात व्यक्त करत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये असे लिहिले आहे की. नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या बाहेर पाठवणे हे धोकादायक आहे. कारण अशा पद्धतीची लोक काही आंतरराष्ट्रीय घटनांसाठी मित्र बनू शकतात.
नवाज शरीफ यांच्या या फोटोमुळे व्यक्त करण्यात येत असलेल्या संपाच्या मागे एक कारण आहे. ते म्हणजे हमदुल्लाह मोहिब यांचे एक विधान आहे. त्यांनी या वर्षातच मे महिन्यात पाकिस्तानला एक वेश्यालय असे म्हटले होते. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी हे मोहिब यांच्या या विधानामुळे नाराज होते. त्याचवेळी त्यांनी म्हटले होते की, कोणताही पाकिस्तानी त्यांच्या सोबत हातमिळवणी किंवा बातचीत सुद्धा करणार नाही. मात्र आता शरीफ यांच्या भेटीनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.