Foreign Workers in Singapore: सिंगापूर मध्ये तब्बल 13 हजार परदेशी कामगारांना कामावर येण्यापासून रोखले; मोठ्या प्रमाणावर भारतीयांचा समावेश, जाणून घ्या कारण

कोविड-19 (Coronavirus) चाचणीची अंतिम मुदत चुकल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या 13,000 कर्मचार्‍यांमध्ये भारतीयांची संख्या खूप मोठी आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

सिंगापूरमध्ये (Singapore) 13,000 परदेशी कामगारांना (Foreign Workers) कामावर परत येण्यापासून रोखले आहे. कोविड-19 (Coronavirus) चाचणीची अंतिम मुदत चुकल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या 13,000 कर्मचार्‍यांमध्ये भारतीयांची संख्या खूप मोठी आहे. सिंगापूरमधील अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, सिंगापूरमध्ये सुमारे 13,000 परदेशी कामगारांना कामावर येऊ दिले नाही, कारण त्यांनी ठरलेल्या मुदतीमध्ये सरकारने अनिवार्य केलेली कोरोनाची चाचणी केली नाही. आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या 13,000 परदेशी कर्मचार्‍यांच्या अ‍ॅक्सेस कोडची स्थिती 'लाल' राहील आणि ते पुन्हा कामावर येऊ शकणार नाहीत.

निवेदनात असेही म्हटले आहे की, इतर कर्मचार्‍यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलले गेले आहे. या कर्मचार्‍यांनी 5 सप्टेंबर शेवटची मुदत असलेली रोझर्ड रुटीन चाचणी (Rostered Routine Testing) केली नाही. जेव्हा या कामगारांच्या चाचण्या पूर्ण केल्या जातील, तेव्हा त्यांचे अ‍ॅक्सेस कोड ’ग्रीन’ मध्ये पुनर्संचयित केले जातील आणि त्यांना पुन्हा कामावर परत येऊ दिले जाईल. सरकारने घेतलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून, वसतिगृहात राहणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांना 14 दिवसांत आपली नियमित चाचणी करून घ्यावी लागेल. या वसतिगृहात राहणारे बहुतेक कर्मचारी भारतीय आहेत. (हेही वाचा: भारतीय लष्कराने LAC पार केल्याचा चीनचा दावा; लदाख मध्ये Pangong Tso Lake जवळ 'Warning Shots' झाडल्याचादेखील आरोप)

सिंगापूरचे मनुष्यबळ मंत्रालय, आर्थिक विकास मंडळ, इमारत आणि बांधकाम प्राधिकरण आणि आरोग्य जाहिरात मंडळ ऑगस्टपासून नियोक्तांना या चाचणीबाबत जनजागृती करत आहेत. तसेच 5 सप्टेंबरच्या मुदतीच्या आधी आरआरटी ​​चाचण्या करवून घेण्यासाठी आपल्या कर्मचार्‍यांना आठवण करून देण्यास सांगत आहे. दरम्यान, सिंगापूरमध्ये मंगळवारी 47 नवीन कोरोनो व्हायरस प्रकरणे नोंदविण्यात आली असून, देशातील एकूण कोरोना प्रकरणाची संख्या 57,091 झाली आहे. येथे कोरोना विषाणू रुग्णांमध्ये स्थलांतरित कामगारांची अधिक प्रकरणे आहेत.