Foreign Investment in Mecca, Medina Real Estate: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; आता परदेशी लोक करू शकतात पवित्र शहरे मक्का आणि मदिनामध्ये गुंतवणूक

या नवीन नियमानुसार, या दोन शहरांमध्ये असलेल्या सौदी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतील. एखादी व्यक्ती असो किंवा कंपनी, कोणत्याही प्रकल्पात परदेशी गुंतवणूकदारांचा एकत्रित हिस्सा केवळ 49 टक्क्यांपर्यंत असेल.

Foreign Investment in Mecca, Medina Real Estate: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; आता परदेशी लोक करू शकतात पवित्र शहरे मक्का आणि मदिनामध्ये गुंतवणूक
Muslim pilgrims are seen around the Kaaba at the Grand Mosque in Mecca, Saudi Arabia | File Pic | Photo Credit: IANS

Foreign Investment in Mecca, Medina Real Estate: सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) क्राउन प्रिन्स आणि राज्याचे शासक मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'व्हिजन 2030' अंतर्गत मक्का आणि मदिना येथे परदेशी गुंतवणुकीला (Foreign Property Investments) प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. इस्लामची पवित्र शहरे मक्का आणि मदिना येथील सरकारी रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूक करू शकतात, असे सौदी अरेबियाने म्हटले आहे. अधिकाधिक परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या भांडवली बाजार प्राधिकरणाचे (CMA) हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. परकीय गुंतवणुकीला चालना देणे, येथील भांडवली बाजार मजबूत करणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा-

या नवीन नियमानुसार, या दोन शहरांमध्ये असलेल्या सौदी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतील. एखादी व्यक्ती असो किंवा कंपनी, कोणत्याही प्रकल्पात परदेशी गुंतवणूकदारांचा एकत्रित हिस्सा केवळ 49 टक्क्यांपर्यंत असेल. सौदी अरेबियाच्या कॅपिटल मार्केट अथॉरिटीने जारी केलेल्या निवेदनानुसार, सोमवार, 27 जानेवारीपासून, परदेशी गुंतवणूकदार सौदी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांमधील शेअर्स खरेदी करू शकतात. या वृत्तानंतर काही रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. सौदी अरेबियातील जबल उमर डेव्हलपमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये 10% पर्यंत वाढ दिसून आली. दार अल अर्कान रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी, तैयबा इन्व्हेस्टमेंट कंपनी, एमार इकॉनॉमिक सिटी आणि मक्का कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट कंपनीचे शेअर्सही वाढले. (हेही वाचा: Kailash Mansarovar Yatra: कैलास मानसरोवर यात्रेसाठी कवाडे खुली; भारत आणि चीन यांच्यात द्विपक्षीय चर्चेदरम्यान संमती, निश्चित प्रारंभ कधी? जाणून घ्या सविस्तर)

परदेशी गुंतवणूकदारांसाठी सुलभ गुंतवणूक-

सौदी अरेबियाच्या भांडवली बाजार प्राधिकरणाने अनेक सुधारणा सादर केल्या आहेत, ज्यामुळे सौदी भांडवली बाजार परदेशी गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ होईल. यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांना थेट सौदी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची परवानगी देणे, विदेशी कंपन्यांना स्वॅप कराराद्वारे गुंतवणूक करण्याची परवानगी देणे आणि इतर अनेक बाबींचा अनेकांचा समावेश आहे. सौदी अरेबियामध्ये परदेशी लोकांना मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी आहे, परंतु यावरही विशेष निर्बंध आहेत. राज्याच्या पवित्र शहरांमधील मालकी सामान्यतः सौदी नागरिकांसाठी मर्यादित आहे. मात्र, तेथे परदेशी लोक जमीन भाडेतत्त्वावर घेऊ शकतात.

क्राउन प्रिन्सदेखील परदेशी गुंतवणुकीच्या बाजूने-

या नव्या पाऊलामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा केवळ मार्गच खुला होणार नाही, तर देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'व्हिजन 2030' अंतर्गत, देशात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. विदेशी गुंतवणूक, व्यापार आणि पर्यटनाला चालना दिली जात आहे. इथल्या कच्च्या तेलावर आधारित अर्थव्यवस्थेत वैविध्य आणण्याचाही त्याचा उद्देश आहे. या दशकाच्या अखेरीस $100 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us