Firing in Mosque: नायजेरियात मस्जिदीच्या आतमध्ये जोरदार गोळीबार, नमाज अदा करण्यासाठी आलेल्या 18 जणांचा मृत्यू
या घटनेत 18 जणांचा बळी गेला आहे.
Firing in Mosque: नायजेरियात उत्तर भागात नमाज अदा करण्याच्या वेळेस एका मस्जिदमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 18 जणांचा बळी गेला आहे. स्थानिक अधिकारी आणि पोलिसांनी ही माहिती दिली असून माशेगू स्थानिक सरकारी परिसरातील माजकुका गावात झाली आहे. हल्लेखोर वांशिक फुलानी भटक्या खेडूत समुदायातील असल्याचा संशय आहे. त्यांनी घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे.
या प्रकारच्या जातीय हिंसेत वर्षभरात आतापर्यंत शेकडो जणांचा बळी गेला आहे. जातीय हिंसेची ही घटना देशात पाणी आणि जमीनीच्या मुद्द्यावरुन काही दशकांपासून सुरु असलेल्या संघर्षाचे परिणाम आहेत. संघर्षाचे बळी झालेल्या फुलानी समुदायातील काही लोक स्थानिक होसा कृषक समुदायाच्या विरोधात हत्यारे उगारत आहेत. माशेगू स्थानीक सरकारी परिसराचे अध्यक्ष अल्हासन इसार यांनी एपी यांना म्हटले की, हल्लेखोरांनी मस्जिदीला घेरून गोळीबार केला. यामध्ये अन्य चार जण सुद्धा जखमी झाले आहेत.(इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती यांची मुलगी स्विकारणार हिंदू धर्म, जाणून घ्या का घेतला निर्णय)
नायजेरियाचे पोलीस आयुक्त कुर्यस यांनी सोमवारी असे म्हटले की, हल्ला ग्रामीण आणि फुलानी चरवाह समुदायाच्या दरम्यान संघर्ष होत आहे. या हल्ल्यामुळे दिसून येते की, देशातील सुरक्षा स्थिती किती खराब आबे. नायजेरियातील उत्तरपश्चिम आणि मध्य क्षेत्रातील बहुतांश राज्यांची अशीच परिस्थिती आहे. हिंसेमुळे फटका बसलेले बहुतांश समुदायातील लोक दुर्गम ठिकाणी राहतात. या लोकांसाठी माजाकुका सारख्या परिसरात येणे मुश्किल आहे. जी राज्याच्या राजधानीपासून 270 किमी दूर आहे.
बंदूकधाऱ्यांची संख्या ही समुदायातील सुरक्षा कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक असते. त्यामुळे बंदूकधारी आरामात अपराध करु शकतात. घटनेची सुचना मिळताच पोलीस येतात पण त्याआधीच हल्लेखोर पळ काढतात. तर एका आठवड्यापूर्वी उत्तरपश्चिम सोकोता राज्यात हल्लेखोरांनी एका ग्रामीण परिसरात हल्ला केला होता. ते तेथे 12 तास होते. या घटनेत कमीत कमी 40 लोकांचा मृत्यू झाला होता.