Kuwait: कुवैत येथे जगातील सर्वात मोठ्या Tyre Graveyard ला भीषण आग, उपग्रहांनीही टीपली काळ्या ढगांची छायाचित्रे

गेले चार दिवस झाले ही आग धुमसते आहे. जमिनीतील माती उपसून तयार केलेल्या मठ्ठ्या खड्ड्यात सुमारे 70 लाख टायर आहेत.

Fire at Tyre Graveyard in Kuwait | (Photo Credit: Twitter)

कुवैत (Kuwait) येथील सुलैबिया परिसरात (Sulaibiya Area of Kuwait) जगातील सर्वात मोठे टायर कब्रस्तान (World’s Biggest Tyre Graveyard) असलेल्या परिसराला आग (Fire) लागली आहे. गेले चार दिवस झाले ही आग धुमसते आहे. जमिनीतील माती उपसून तयार केलेल्या मठ्ठ्या खड्ड्यात सुमारे 70 लाख टायर आहेत. एकदो नव्हे तर जवळपास सहा एकर अतक्या प्रचंड मोठ्या परिसरात हे कब्रस्थान विस्तारले आहे. या कब्रस्तानामध्ये भडकलेली आग इतकी प्रचंड आहे की, या आगीच्या धुरांनी निर्माण झालेल्या काळ्या ढगांची (Black Smoke Clouds) छायाचित्रे थेट उपग्रहांनीही टिपली गेली आहेत.

इतक्या मोठ्या प्रमाणावर भडकलेल्या आगीमुळे सहाजीकच जगभरात पर्यावरण प्रदुषणाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. 'द सन' ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, सुलैंबिया इथल्या या टायर भंडाराला जगातील टायर्सचे सर्वात मोठे भांडार म्हणून ओळखले जाते. असेही सांगितले जात आहे की, हे टायर कुवैत आणि इतर देशांचेही आहेत. ज्यांनी हे टायर घेऊन जाण्यासाठी पैसैही दिले आहेत. या टायर्सची विल्हेवाट लावण्याची (डिस्पोजल) जबाबदारी चार कंपन्यांवर सोपविण्यात आली होती. दरम्यान, आता एक प्रश्न असाही उपस्थित केला जात आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या देशात इतके टायर्स का जमा करावेत. ज्या देशाचे सर्वसामान्य तापमान हे 50 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते. (हेही वाचा, Australia Bushfire: वणवा नव्हे! ऑस्ट्रेलियातील जंगलाला जाणीवपूर्वक लावली आग; पोलिसांकडून 200 जणांवर गुन्हे दाखल, सरकारची महत्त्वपूर्ण कारवाई)

ट्विट

पाठिमागील 30 वर्षांपासून कुवैत सरकारने टायर्सची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून रिसायकल केल्या जाणाऱ्या 95% टायर्सना हटविण्याची ही योजना आहे. दरम्यान, टायरच्या कब्रस्तानला आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधीही 2012 मध्येही आणखी एका टायर डंप (Kuwaiti Tyre Dump) मध्ये आग भडकली होती. त्यात 50 लाखांहून अधिक टायर्स जळून खाक झाले होते.

उघड्यावर मोठ्या प्रमाणावर टायर्स जळाल्यामइळे हवेत कार्सिनोजेनिक डाइऑक्साइन्स (Carcinogenic Dioxins) मिसळला जातो. ज्यामुळे नागरिकांना श्वसनविकार, अस्तमा आणि इतर अनेक विकारांचा सामना करावा लागतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif