Fart Against Will: 'मला जबरदस्तीने इच्छेविरुद्ध पादायला भाग पाडले जायचे', नर्सने सरकारी हॉस्पिटलवर केले गंभीर आरोप
सँड्रा पुढे म्हणाल्या की, ‘हे अत्यंत त्रासदायक आणि कामाच्या ठिकाणी लक्ष विचलित करणारे आहे. यामुळे शरीराच्या विविध भागांवर, अगदी प्रायव्हेट पार्टसवरही हल्ला केल्याची भावना निर्माण होत आहे.’
हॉस्पिटल हे जगातील एक असे ठिकाण आहे जिथे मरणाच्या दारात असलेला मनुष्यही मोठ्या आशेने पोहोचतो. रुग्णालयातच आपल्याला छोटे-मोठे आजार, रोग यांच्यापासून सुटका मिळते. मात्र जर का अशा रुग्णालयांमध्ये विचित्र वैद्यकीय प्रयोगांच्या (Weird Medical Experiment) नावाखाली एखाद्या व्यक्तीची पिळवणूक होत असेल तर? कोणीही ही गोष्ट सहन करू शकणार नाही. लंडनस्थित सँड्रा सॅमसन (Sandra Samson) या नर्सनी रुग्णालयावर एक गंभीर आरोप केला आहे. या नर्सने म्हटले आहे की, ‘रुग्णालयात मला जबरदस्तीने इच्छेविरुद्ध पादायला (Fart) भाग पाडले जायचे.’
‘डेली स्टार’ने याबाबत वृत्त दिले आहे. एका माजी परिचारिकेने एनएचएसवर अयशस्वी खटला दाखल केला आहे. यामध्ये दावा केला आहे की, तिच्यावर रुग्णालयात 'संमोहन प्रयोग’ केले जायचे, ज्यामुळे ती तिच्या इच्छेविरुद्ध पादायची. डिसेंबर 2019 मध्ये, यूकेच्या सरकारी आरोग्य रुग्णालयात एकलिंगमध्ये काम करणाऱ्या सँड्राला अचानक कामावरून काढून टाकण्यात आले होते. रुग्णालयाने सांगितले की, या नर्सने तिचे मानसिक संतुलन गमावले आहे तसेच तिने रुग्णालयाने देऊ केलेले उपचार नाकारले आहेत.
त्यानंतर सॅमसनने लंडन नॉर्थ वेस्ट युनिव्हर्सिटी हेल्थकेअर एनएचएस ट्रस्टवर आपल्यावर अन्याय केल्याचा आणि अपंगत्वाशी निगडीत भेदभाव केल्याचा खटला दाखल केला. आपल्या आरोपपत्रात सँड्राने लिहिले आहे की, तिचा बॉस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात विचित्र गोष्टी करायला लावत असे. तो आपल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवायचा आणि त्यांना अवघडलेल्या वातावरणात काम करायला लावायचा. यामध्ये कर्मचाऱ्यांना उकाड्यामध्ये काम करायला भाग पाडणे समाविष्ट आहे. तसेच कामाची जागाही हवेशीर नव्हती.
सँड्रा यांनी रुग्णालयावर आणखी गंभीर आरोप केले की, रुग्णालय आपल्या वैद्यकीय प्रयोगाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना विचित्र गोष्टी करायला लावत असे. सँड्रा म्हणाली की, ती बरीच फिट आहे. तिचा पूर्वीचा वैद्यकीय इतिहासही नाही. पण काही काळापासून तिचे सतत डोके दुखत आहे, पोटदुखी आणि गॅसची समस्या सुरु झाली. याचे कारण म्हणजे, त्यांच्यावर रुग्णालयाकडून केले जाणारे उपचार आणि त्यांना पुरवले जाणारे खराब वातावरण हे होते. सँड्राच्या म्हणण्यानुसार, रुग्णालय त्यांना अशी औषधे देत होते तसेच त्यांच्यावर संमोहन उपचार केले जायचे, ज्यामुळे त्यांना जबरदस्तीने गॅस पास करण्यास भाग पाडले जात असे. हॉस्पिटल आपल्या प्रयोगांसाठी हे करत असे, असे त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा: पोलिसांकडे बघून जोरात पादल्याने तब्बल 43 हजाराचा दंड; जाणून घ्या नक्की काय घडले)
सँड्रा पुढे म्हणाल्या की, ‘हे अत्यंत त्रासदायक आणि कामाच्या ठिकाणी लक्ष विचलित करणारे आहे. यामुळे शरीराच्या विविध भागांवर, अगदी प्रायव्हेट पार्टसवरही हल्ला केल्याची भावना निर्माण होत आहे.’ परंतु, जेव्हा या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाला रुग्णालयाच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. रुग्णालयाने नर्सला मानसिक रुग्ण घोषित केले होते. या आधारावरच न्यायालयानेही आपला निर्णय दिला. अशा स्थितीत रुग्णालयावर कोणतीही कारवाई करता येत नाही.’
(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2021 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

