Elon Musk Net Worth: एलॉन मस्कने रचला इतिहास; एकूण संपत्ती 400 अब्ज डॉलर्सच्या पुढे
या शेअर विक्रीमुळे मस्कची एकूण संपत्ती सुमारे 50 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.
Elon Musk Net Worth: स्पेसएक्स (SpaceX) आणि टेस्ला (Tesla) सारख्या बड्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी संपत्ती मिळवण्याच्या बाबतीत नवा इतिहास रचला आहे. एलॉन मस्क यांची सध्याची संपत्ती 400 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही व्यक्तीची संपत्ती 400 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलेली नाही. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, एलॉन मस्कची सध्याची एकूण संपत्ती 447 डॉलर्स अब्ज झाली आहे. मस्कच्या संपत्तीमध्ये नवीनतम बदल 62.8 अब्ज डॉलर्स आहे. एवढेच नाही तर या वर्षात मस्कची एकूण संपत्ती 218 अब्ज डॉलरने वाढली आहे.
SpaceX ने शेअर्स खरेदी केल्यानंतर संपत्तीत वाढ -
एलॉन मस्कच्या निव्वळ संपत्तीमध्ये ही अविश्वसनीय वाढ त्याच्या एरोस्पेस कंपनी SpaceX च्या शेअर्सच्या महत्त्वपूर्ण आणि मोठ्या विक्रीनंतर आली आहे. या शेअर विक्रीमुळे मस्कची एकूण संपत्ती सुमारे 50 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या नुकत्याच अंतर्गत शेअर विक्रीमध्ये, SpaceX ने कर्मचारी आणि कंपनीच्या लोकांकडून 1.25 बिलियन डॉलर्सपर्यंतचे शेअर्स खरेदी केले आहेत. या व्यवहारानंतर, SpaceX चे मूल्यांकन सुमारे 350 अब्ज डॉलर्सने वाढले आहे. (हेही वाचा -Elon Musk’s Net Worth: अमेरिकेच्या निवडणुकीनंतर एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 300 अब्ज डॉलरवर पोहोचली; Tesla ने पुन्हा प्राप्त केले $1 ट्रिलियन मार्केट कॅप)
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने इलॉन मस्क यांना हा टप्पा गाठण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या विजयानंतर, मस्कच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर्स सुमारे 65% वाढले आहेत आणि त्याच्या शेअर्सची किंमत 415 डॉलर्सच्या उच्चांकावर पोहोचली आहे. इलॉन मस्कचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी खूप जवळचे संबंध आहेत. ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. (हेही वाचा - Elon Musk to Support New Trump PAC: डोनाल्ड ट्रम्प यांना एलोन मस्कचा मोठा पाठिंबा; दरमहा देणार 376 कोटी रुपयांची देणगी
जेफ बेझोस जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती -
दरम्यान, इलॉन मस्कच्या संपत्तीने 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला असतानाच, टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या इतर दिग्गजांच्या संपत्तीतही मोठी झेप घेतली आहे. ॲमेझॉनचे जेफ बेझोस हे 249 अब्ज डॉलर्ससह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती 224 अब्ज डॉलरवर पोहोचली असून ते जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.