Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानात पुन्हा भूकंपाचे धक्के; हेरात प्रांतात 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
प्रत्यक्षात गेल्या आठवडाभरात भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
Afghanistan Earthquake: रविवारी सकाळी पश्चिम अफगाणिस्तानात (Afghanistan) पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 इतकी मोजली गेली आहे. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या जोरदार भूकंपांच्या मालिकेनंतर हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. या गावात संपूर्ण गावे उद्ध्वस्त झाली आहेत.
भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. प्रत्यक्षात गेल्या आठवडाभरात भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा - Afghanistan Earthquake: 6.3 रिश्टल स्केलच्या धक्क्याने पुन्हा हादरलं अफगाणिस्तान)
भूकंपात आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू -
अफगाणिस्तानातील लोकांना एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यामध्ये आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील भूकंप हा सीरिया आणि तुर्कस्तानमधील भूकंपापेक्षा भयंकर असल्याचे मानले जाते.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी कार्यालयाने भूकंपाला प्रतिसाद देण्यासाठी 5 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या दुर्घटनेतून वाचलेल्यांसाठी निवारा, अन्न आणि वैद्यकीय सुविधांबाबत चिंता व्यक्त केली आहे.