1 तास PUBG खेळल्यावर 700 रुपये कमवण्याची चीन देतोय संधी
पबजी गेम 1 तास खेळल्यावर 700 रुपये मिळवण्याची संधी.
भारतामध्ये (India) पबजी (PUBG) या गेमवर विविध राज्यातून बंदी घालण्यावर मागणी केली जात आहे. तसेच पबजी गेम खेळल्यामुळे मानसिक संतुलन बिघडत असल्याच्या घटनासुद्धा समोर आल्या आहेत. तरीही आता जगभरात पबजी गेमसीठी टुर्नामेंट भरवण्यात येतात. तसेच टुर्नामेंटमध्ये विजयी होणाऱ्याला टीमला लाखो रुपयांचे बक्षिससुद्धा दिले जाते.
मात्र आता चीन (China) पबजी गेम 1 तास खेळल्यावर 700 रुपये देत असल्याची माहिती abacusnews यांनी त्यांच्या रिपोर्टमधून दिली आहे. सध्या चीनमध्ये गेम चॅम्पियन्स सुरु असून अज्ञात व्यक्तींसोबत पबजी गेम खेळायचा आहे. त्यासाठी फक्त 700 रुपये दिले जात आहेत. या चॅम्पियन्समध्ये ऑनलाईन गेमर्सला प्रथम प्राधान्य देण्यात येते.(हेही वाचा-PUBG खेळणाऱ्यांसाठी खुशखबर; गेम खेळून जिंका 1 कोटी रुपये)
पबजी खेळल्यावर 700 रुपये मिळणार असल्याची ऑफर फक्त चीनमध्ये उपलब्ध आहे. तर Miui नावाच्या पदवीधर विद्यार्थ्याने 1 तास पबजी खेळल्यामुळे त्याला 700 रुपये मिळाले असल्याचे वृत्तामधून सांगण्यात आले आहे.