Indian Student Killed by Homeless Man: मद्यधुंद आरोपीने भारतीय विद्यार्थ्याच्या डोक्यावर हातोड्याने केले 50 वार; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विवेक सैनी गेल्या काही दिवसांपासून हल्लेखोराला सर्व आवश्यक वस्तू देत होता. विवेक सैनीला आरोपीची दया आली. त्याने आरोपीला चिप्स, कोक, पाणी आणि उबदारपणासाठी एक जॅकेटही दिले.
Indian Student Killed by Homeless Man in Georgia : अमेरिकेत नुकतीच एमबीएची पदवी पूर्ण केलेल्या 25 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची जॉर्जिया (Georgia) राज्यातील लिथोनिया शहरात एका बेघर व्यसनी व्यक्तीने बेदम मारहाण करून हत्या (Murder) केली. ही संपूर्ण घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामध्ये आरोपी क्रुर कृत्य करताना दिसत आहे.
आरोपीने विद्यार्थ्याच्या डोक्यात होतोड्याने केले 50 वार -
हल्लेखोर ज्युलियन फॉकनर याने विवेक सैनीच्या डोक्यावर हातोड्याने सुमारे 50 वार केल्याचे कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विवेक सैनी गेल्या काही दिवसांपासून हल्लेखोराला सर्व आवश्यक वस्तू देत होता. विवेक सैनीला आरोपीची दया आली. त्याने आरोपीला चिप्स, कोक, पाणी आणि उबदारपणासाठी एक जॅकेटही दिले. (हेही वाचा -Indian-Origin Couple Found Dead in US: अमेरिकेतील आलिशान हवेलीत भारतीय वंशाच्या पतीपत्नीचा मुलीसह गूढ मृत्यू)
एका स्टोअरमध्ये अर्धवेळ काम करणारा हा भारतीय विद्यार्थी (विवेक) आणि स्टोअरचे काही कर्मचारी काही दिवसांपासून आरोपीला मदत करत होते. या घटनेची माहिती देताना डब्ल्यूएसबी-टीव्ही या स्थानिक वाहिनीने सांगितले की, 25 वर्षीय विवेक सैनीचा मृत्यू झाल्याची घटना 18 जानेवारी रोजी घडली. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 18 जानेवारीच्या रात्री उशिरा विवेकवर लिथोनियामधील स्नॅपफिंगर आणि क्लीव्हलँड रोड येथील शेवरॉन फूड मार्टमध्ये एका बेघर माणसाने हातोड्याने हल्ला केला. (वाचा - Indian Student Found Dead in Italy: इटलीत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी कुटुंबीयांनी मागितली सरकारकडे मदत)
स्थानिकांनी यासंदर्भात तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांना फॉकनर सैनीच्या निर्जीव मृतदेहावर उभा असल्याचे दिसले. बीटेक पूर्ण करून दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेल्या या तरुण विद्यार्थ्याने अलीकडेच व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सध्या हरियाणातील सैनी यांचे कुटुंब त्यांच्या होतकरू मुलाच्या निधनामुळे दु:खात बुडाले आहे. त्याचे आई-वडील, गुरजीत सिंग आणि ललिता सैनी या घटनेने पूर्णता हादरून गेले आहेत.