इस्लामाबाद येथील भारतीय दूतवासाच्या वर ड्रोन दिसल्याने सरकाराची चिंता वाढली
मात्र ही बाब सरकारने गांभीर्याने घेतली असून पाकिस्तानवर याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
इस्लामाबाद (Islamabad) स्थित भारतीय दूतवासाच्या वर ड्रोन दिसून आल्याने भारत सरकारची चिंता वाढली आहे. मात्र ही बाब सरकारने गांभीर्याने घेतली असून पाकिस्तानवर याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची जाणकर एका सुत्राने PTI यांना ही माहिती दिली आहे. सूत्रांनी असे म्हटले की, भारताने या प्रकरणी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मिशनमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पाकिस्तानी अथॉरिटीजच्या सोबत भारतीय दूतवासांकडून याबद्दल उच्च स्तरावर चर्चा केली आहे.
जम्मू मध्ये वायूसेनेच्या एअरस्टेशनवर 27 जून रोजी मध्यरात्री ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता अधिक वाढली आहे. पण इस्लामाबाद मधील भारतीय दूतवासावर ड्रोन दिसल्याप्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत विधान जाहीर करण्यात आलेले नाही. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, असे पहिल्यांदाच झाले की भारतातील महत्वपूर्ण प्रतिष्ठांना ड्रोनच्या माध्यमातून संदिग्ध पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांनी निशाणा बनवले आहे. सेनाध्यक्ष एम. एस. नरवणे यांनी गुरुवारी असे म्हटले की, सहजपणे ड्रोनची उपलब्धता केल्यामुळे आव्हानांचा गुंता अधिक वाढला आहे.(North Korea Food Crisis: उत्तर कोरियामध्ये मोठे अन्नधान्य संकट; एक किलो केळी 3,336 रुपये, तर 'ब्लॅक टी'ची किंमत 5,167 रुपये)
Tweet:
तसेच 30 जून रोजी सुद्धा दोन ड्रोन जम्मू मध्ये दिसून आले होते. एक ड्रोन सकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी कालूचक परिसरात दिसला. तर दुसरा ड्रोन 4 वाजून 52 मिनिटांनी कुंजवानी येथे दिसला. मोठी गोष्ट अशी की, हे दोन्ही परिसर एअरफोर्स स्टेशनच्या 7-10 किलोमीटरमध्ये येतात. असे म्हटले जात आहे की, जम्मू एअरफोर्स स्टेशनवर हल्ल्यानंतर सातत्याने ड्रोन दिसून येत आहेत. ही बाब सुरक्षा बलासाठी एक चिंतेचे कारण ठरले आहे. ऐवढेच नव्हे तर मिलिस्ट्री बेस आणि मिलिस्ट्री स्टेशन जवळ हे ड्रोन आढळून येत आहेत.