Donald Trump Jr यांची गर्लफ्रेंड Kimberly Guilfoyle ला कोरोना विषाणूची लागण; सध्या दोघेही आयसोलेशनमध्ये
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्या ज्येष्ठ मुलाची (Donald Trump Jr) मैत्रीण किंबर्ली गुईलफोईलला (Kimberly GuelFoile) कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याचे आढळले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्या ज्येष्ठ मुलाची (Donald Trump Jr) मैत्रीण किंबर्ली गुईलफोईलला (Kimberly GuelFoile) कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याचे आढळले आहे. ट्रम्प यांच्या प्रचार वित्त समितीचे चीफ ऑफ स्टाफ सर्जिओ गोरे यांनी सांगितले की, गुईलफोईलला संसर्ग झाल्यावर त्वरित आयसोलेशनमध्ये ठेवले गेले आहे. मात्र कोविड-19 ची कोणतीही लक्षणे दिसली नसल्याने, पुन्हा एकदा विषाणूच्या निकालांची पुष्टी करण्यासाठी तिची पुन्हा तपासणी केली जाईल. सध्या गुईलफोईल ठीक असून, तिने तिचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
महत्वाचे म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प जूनियर यांच्यामध्ये कोणतेही संक्रमण आढळले नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून ते ही आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनीही आपले सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांना डेट करत असलेली, किंबर्ली गुईलफोईल फॉक्स न्यूज टेलिव्हिजनचे एका लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. माउंट रशमोर येथे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे चौथे भाषण आणि उत्सवाची आतषबाजी पाहायला किंबर्ली दक्षिण डकोटा येथे गेली होती. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, कोरोना संसर्गाची माहिती मिळाल्यानंतर 51 वर्षांची किम्बरली त्वरित आयसोलेट झाली.
(हेही वाचा: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात इराणकडून अटक वॉरंट जारी; पकडण्यासाठी Iran ने मागितली इंटरपोलकडे मदत)
अमेरिकन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळ असलेल्या लोकांना कोरोना व्हायरस विषाणूची लागण झालेली किंबर्ली तिसरी व्यक्ती आहे. इतर दोघांमध्ये ट्रम्प यांचे वैयक्तिक कर्मचारी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपतींचे प्रेस सचिव यांचा समावेश आहे. याआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही कोरोना व्हायरसची चाचणी झाली होती, मात्र ती नकारात्मक आली होती. सध्या डोनाल्ड ट्रम्प, चीनमधून कोरोना व्हायरस जगात पसरला याबाबत डब्ल्यूएचओवर ताशेरे ओढत आहेत.