Donald Trump ठरले Hush Money प्रकरणात दोषी; पहिल्यांदाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर अशी कारवाई
अमेरिकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार हा गुन्हा ठरत असला, तरी एखादं प्रकरण दडपण्यासाठी केलेला आर्थिक गैरव्यवहार हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा मानला जातो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना Hush Money Trial मध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. अशाप्रकारे कारवाई होणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. 2016 च्या निवडणुकीपूर्वी Stormy Daniels या पोर्न स्टारला गप्प करण्याच्या उद्देशाने पैसे दिल्याचं झाकण्यासाठी खोटे दस्तऐवज केल्याबद्दल न्यूयॉर्कच्या ज्युरीच्या निकालात ट्र्म्प दोषी ठरले आहेत. दोन दिवसांच्या चर्चेनंतर, 12 सदस्यीय ज्युरीने ट्रम्प यांना सर्व 34 गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, या आरोपांमध्ये चार वर्षांपर्यंत संभाव्य तुरुंगवासाची शिक्षा आहे, तरी दोषी व्यक्तींना सामान्यत: लहान शिक्षा, दंड किंवा प्रोबेशन मिळते.
ट्रम्प यांनी कोणतेही चुकीचे कृत्य केल्याचे नाकारले आहे तसेच आपण दोषी नसल्याचं म्हटलं आहे. रिपब्लिकन पक्ष 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी अध्यक्षपदासाठी औपचारिकपणे नामनिर्देशित करण्याच्या काही दिवस आधी न्यायाधीश Juan M. Merchan यांनी 11 जुलै रोजी ट्रम्प यांची शिक्षा सुनावली जाणार आहे. तर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन 15 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी पक्षाकडून पुढच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्याची तयारी असताना आता ही घोषणा होबार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे .अहवालाच्या माहितीनुसार, तुरुंगवासामुळे ट्रम्प निवडून आल्यास कॅम्पेन चालवण्यापासून किंवा पद स्वीकारण्यापासून कायदेशीररित्या त्यांना थांबवता येणार नाही.
रॉयटर्सच्या हवाल्यानुसार, लोकांचा खरा निकाल 5 नोव्हेंबरला असणार आहे. ट्रम्पचे वकील Will Scharf, यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, "आम्ही शक्य तितक्या लवकर अपील करणार आहोत. आम्ही या प्रकरणाचा त्वरीत आढावा घेऊ." Donald Trump Hush Money Trial: डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधीत हश मनी खटला सुरु असताना एकाने स्वत:ला पेटवले (Watch Video) .
‘Hush Money’ प्रकरण काय आहे?
Stormy Daniels या पॉर्नस्टार ने ट्रम्प यांच्याबरोबर पूर्वी संबंध असल्याचा दावा करून त्यासंबंधी किस्से आणि आठवणी अमेरिकेतील काही प्रकाशकांकडे प्रसिद्धीसाठी पाठवल्या होत्या. त्यांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी ट्रम्प यांनी, 2016 मध्ये अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना पैसे दिले होते. स्टॉर्मी डॅनियल्सला 130000 डॉलर्स दिल्याचे सांगितले जाते. हे पैसे ट्रम्प यांचे सहकारी मायकेल कोहेन यांच्या कडून ट्रम्प यांच्या सांगण्यावरून देण्यात आले. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी कोहेन यांना ते पैसे परत केले. पण हा व्यवहार कोहेन यांचे मानधन म्हणून देण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.
अमेरिकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार हा गुन्हा ठरत असला, तरी एखादं प्रकरण दडपण्यासाठी केलेला आर्थिक गैरव्यवहार हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. दरम्यान दोषी व्यक्तीला निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करणारी तरतूद न्यूयॉर्कच्या कायद्यांमध्ये नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)