Air India Flight Diverted to Russia: दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; रशियाकडे वळवण्यात आली फ्लाइट
गेल्या 13 महिन्यांत रशियामध्ये इमर्जन्सी लँडिंग करणारे एअर इंडियाचे हे दुसरे विमान आहे.
Air India Flight Diverted to Russia: दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला (Delhi-San Francisco) जाणारे एअर इंडियाचे विमान (Air India Flight) AI-183 गुरुवारी तांत्रिक समस्येमुळे रशियाच्या क्रास्नोयार्स्क क्राय येथील क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KJA) वळवण्यात आले. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, कॉकपिट क्रूला कार्गो होल्ड एरियामध्ये संभाव्य समस्या आढळल्यानंतर विमानाने सावधगिरीने लँडिंग केले. गेल्या 13 महिन्यांत रशियामध्ये इमर्जन्सी लँडिंग करणारे एअर इंडियाचे हे दुसरे विमान आहे.
एअरलाइनने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे एअर इंडियाचे उड्डाण AI-183 तांत्रिक कारणामुळे रशियातील क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर (UNKL) वळवण्यात आले आहे. विमान सुरक्षितपणे उतरले आहे. तसेच प्रवाशांची काळजी घेतली जाईल याची खात्री करण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत. एअर इंडियामध्ये आम्ही पुढील कृती ठरवत असताना, आमच्या ग्राहकांची आणि क्रूची सुरक्षा आणि कल्याण हे सर्वोच्च प्राधान्य आहे.' (हेही वाचा -Air India चं Delhi-San Francisco विमान 20 तास उशिरा उडाले; एसी विना विमानात बसलेल्या अनेकांना आली भोवळ!)
प्राप्त माहितीनुसार, दिल्लीहून येणारे फ्लाइट AI 183, 225 प्रवासी आणि 19 क्रू सदस्यांसह क्रास्नोयार्स्क विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि त्यांना पुढील प्रक्रियेसाठी टर्मिनल इमारतीत नेण्यात आले. लवकरच सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या पर्यायी फ्लाइटने प्रवाशांना नेण्याची व्यवस्था करत असल्याचे एअरलाइनने सांगितले आहे. (हेही वाचा - Air India Express: क्रुच्या कमतरतेमुळे एअर इंडिया एक्सप्रेसचे 85 उड्डाणे रद्द)
पहा व्हिडिओ -
केजेए येथे एअर इंडियाचे स्वतःचे कर्मचारी नसल्यामुळे, आम्ही प्रवाशांना सर्व आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी तृतीय-पक्षाच्या समर्थनाची व्यवस्था करत आहोत. एअर इंडिया सरकारी संस्था आणि नियामक प्राधिकरणांशी देखील संपर्कात आहे. आम्ही फेरीसाठी व्यवस्था करत आहोत. प्रवाशांना लवकरात लवकर सॅन फ्रान्सिस्कोला नेण्यासात येईल, असंही एअर लाइनने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, जूनमध्ये लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती. परंतु, विमानात कोणतीही स्फोटके सापडली नव्हती. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, धमकीचा कॉल केल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीला अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.