धक्कादायक : पत्नी समजून मुलीसोबत केला सेक्स; आरोपी पित्याला मिळाली अडीच वर्षांची शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार एका 50 वर्षीय व्यक्तीने आपली पत्नी समजून मुलीसोबतच शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit-File Photo)

Danish Man Rapes His Daughter : वडील आणि मुलीचे नाते एक पवित्र नाते मानले जाते, मात्र याच नात्याला काळिमा फासणारी एक घटना डेन्मार्क (Denmark) येथे घडली आहे. या कलियुगातील पित्याने आपल्याच मुलीसोबत गैरकृत्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका 50 वर्षीय व्यक्तीने आपली पत्नी समजून मुलीसोबतच शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. आश्चर्य म्हणजे, या व्यक्तीने ज्या दिवशी आपल्या मुलीसोबत सेक्स केला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी या व्यक्तीचे लग्न होते. याबात मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यांनतर न्यायालयाने या व्यक्तीला अडीच वर्षांची शिक्षा ठोठवली आहे. आरोपीला वाटले की, तो त्याच्या पत्नीसोबत सेक्स करत आहे, मात्र ती त्याची मुलगी होती.

डेन्मार्कच्या कॉल्डिंग येथे ही घटना, ऑगस्ट 2018 मध्ये घडली आहे. या आरोपीचे दुसरे लग्न होणार होते, त्यासाठी त्याने रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये त्याच्या पहिल्या पत्नीची 20 वर्षीय मुलगीदेखील आली होती. गेले अनेक वर्षे आरोपी वडील आणि या मुलीमध्ये कोणताही संपर्क नव्हता. 2017 च्या ख्रिसमसवेळी ते भेटले होते, त्यानंतर या लग्नावेळी या दोघांची भेट झाली.  (हेही वाचा : 30 टक्के महिला पॉर्नच्या आहारी; Pornhub ला भेट देणाऱ्यांमध्ये भारताचा तिसरा नंबर)

'द सन'ने दिलेल्या माहितीनुसार पार्टीच्या रात्री या मुलीने ब्रायडल सूट घातला होता. त्या रात्री तिने खूप दारूही पिली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी तिला रूमपर्यंत सोडले. साधारण अडीच तासानंतर हा वडील एकाच बेडवर आपली मुलगी आणि होणाऱ्या पत्नीसोबत झोपला. त्याच रात्री त्याच्याकडून हे कृत्य झाले, त्याने पत्नी समजून मुलीसोबत सेक्स केला. त्यानंतर कोर्टात त्याने त्याला काहीच आठवत नसल्याचे सांगितले. तसेच मुलीने लावलेले आरोपही त्याने फेटाळून लावले. मात्र मुलीने त्या रात्री काय घडले हे सांगितले, त्यावर कोर्टाने या वडील आरोपीला अडीच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.