ऑस्ट्रेलिया ने दिली आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये Covishield ला मान्यता
आज ही माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान Scott Morrison यांनी ऑनलाईन ब्रिफिंग दरम्यान दिली आहे.
ऑस्ट्रेलियाने (Australia) आता भारतीय बनावटीच्या कोविशिल्ड (Covishield) या कोविड 19 लस (Covid 19 Vaccine) घेतलेल्यांना त्यांच्या देशात येण्यास मंजुरी दिली आहे. Therapeutic Goods Administration कडून भारताच्या कोविशिल्ड सोबतच चीन च्या Sinovac ला देखील हिरवा कंदील दिला आहे. आज ही माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान Scott Morrison यांनी ऑनलाईन ब्रिफिंग दरम्यान दिली आहे. नक्की वाचा: UK Government कडून Travel Advisory मध्ये बदल करत Covishield चा Approved Vaccine मध्ये समावेश; भारतीयांना Quarantine चे नियम राहणार.
दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये उच्च शिक्षणासाठी, कामासाठी तरूणांना जाण्याचा ओघ जास्त आहे. त्यामुळे या वर्गासाठी ही एक मोठी दिलासाची बाब आहे. ऑस्ट्रेलियामध्ये यापूर्वीच Pfizer, AstraZeneca, Moderna आणि Janssen या लसींना परवानगी देण्यात आली होती.
पंतप्रधान मॉरिसन यांनी बोलताना लवकरच ऑस्ट्रेलिया इंटरनॅशनल बॉर्डर उघडण्याच्या तयारीत असल्याचं तसेच कोविड निर्बंध कमी करण्याच्या विचारात असल्याचे संकेत दिले आहेत. ज्या देशांमध्ये 80% वॅक्सिनेशन झालं आहे अशा देशातील नागरिकांसाठी ऑक्टोबर महिन्यापासून इंटरनॅशनल बॉर्डर सुरू होऊ शकतात. असा ABC News चा रिपोर्ट आहे.
सध्या नव्या नियमांनुसार, पूर्ण लसवंत ऑस्ट्रेलियन नागरिक आणि permanent residents हे New South Wales मध्ये घरीच आठवडाभर क्वारंटाईन राहू शकतात. त्यांना 14 दिवस हॉटेल क्वारंटीनचा हजारो डॉलर्सचा खर्च करण्याची गरज नाही.
ABC News च्या रिपोर्ट नुसार आता ऑस्ट्रेलियन्ससाठी कमर्शिअल फ्लाईट्स सुरू होत आहेत. पण त्यासाठी ते पूर्ण लसवंत असणं आवश्यक आहे. त्यांच्यासाठी यापुढे क्वारंटीनचे नियम नसतील. तर लस न घेतलेल्यांना हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटीन रहावं लागणार आहे. तर एअरपोर्ट वर रॅपिड अॅन्टिजन टेस्टिंग कायम राहणार आहे.