Coronavirus Vaccine Latest Update: कोविड-19 वरील लस 2021 वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होणार नसल्याची WHO च्या प्रवक्त्यांची माहिती- Reuters रिपोर्ट्स
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसह रुग्णांचा झपाट्याने आकडा वाढत चालल्या दिसून आले आहे. कोरोना व्हायरस सारख्या महाभयंकर संकटाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व देशांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत जगभरातील वैज्ञानिक कोविड19 वरील लसी संदर्भात संशोधन करुन ती विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या वर्षाच्या अखेर पर्यंत कोरोनावरील लस येईल अशी चर्चा आहे. परंतु आता डब्लूएचओ यांच्या एका प्रवक्त्याने कोविड19 वरील लस 2021 वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होणार नसल्याची माहिती दिली आहे. या बद्दल Reutres रिपोर्ट्सकडून अधिक स्पष्ट करण्यात आले आहे.(Global COVID-19 Update: जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 2.56 कोटींच्या पार; एकूण 855,444 रुग्णांचा मृत्यू)
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस सर्वात पुढे असल्याचे मानले जात आहे. ड्रग ट्रायल्सला ट्रॅक करणाऱ्या एअरफिनिटी नावाच्या कंपनीच्या मते, सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत एस्ट्राजेनेका संबंधित परिणाम समोर येऊ शकतो असे म्हटले असून ती कोरोनापासून बचाव करु शकते की नाही हे स्पष्ट होणार आहे. या कंपनीने असा सुद्धा दावा केला आहे की, सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ब्रिटेनला 30 मिलियन म्हणजेच तीन करोड लसीचे टोस देणार आहे.(COVID-19 Vaccine Latest News Update: कोविड 19 वरील Novavax च्या संभाव्य लस NVX-CoV2373 चा सुरूवातीच्या टप्प्याचा अहवाल जाहीर; साईड इफेक्ट्स नसल्यचा दावा)
अमेरिकेत एस्ट्राजेनेका यांच्या द्वारे तयार करण्यात येणारी कोरोनावरील लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात पोहचली आहे. कंपनीच्या मते, अमेरिकेत एकूण 80 ठिकाणांवरील 30 हजार स्वयंसेवकांवर त्याचे परिक्षण केले जात आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे आवाहन केले होते की, एस्ट्राजेनेका लसी ही परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहचली असून ती लसीच्या सुचीत सुद्धा सहभागी करण्यात आली आहे. त्यामुळे याचा वापर लवकरात लवकरत कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी केला जाणार आहे.