Uzbekistan's Unique COVID-19 Offer: उझबेकिस्तान सरकारची पर्यटकांसाठी स्पेशल ऑफर, पर्यटकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्यास देणार 3,000 डॉलर्स

विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उझबेकिस्तानने एक आगळी-वेगळी युक्ती लढवली आहे. पर्यटकांना त्यांच्या दौर्‍यादरम्यान संसर्ग झाल्यास उझबेकिस्तानने त्यांना 3,000 डॉलर्स देण्याची ऑफर दिली आहे. 33 मिलियनहून अधिक लोकसंख्या असलेल्या उझबेकिस्तानमध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यावर कोविड-19 चे किमान मृत्यूची नोंद केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Getty)

जगभरातील अनेक देश सध्या कोरोना व्हायरसशी (Coronavirus) संघर्ष करत आहे. चीनमधून (China) पसरलेल्या या व्हायरसचा फटका जगातील प्रत्येक देशाला बसला आहे. जगभरात कोरोना संक्रमितांची संख्याही 1 कोटींच्या पार पोहचली आहे. अशा स्थितीत विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उझबेकिस्तानने (Uzbekistan) एक आगळी-वेगळी युक्ती लढवली आहे. पर्यटकांना त्यांच्या दौर्‍यादरम्यान संसर्ग झाल्यास उझबेकिस्तानने त्यांना 3,000 डॉलर्स देण्याची ऑफर दिली आहे. 33 मिलियनहून अधिक लोकसंख्या असलेल्या उझबेकिस्तानमध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यावर कोविड-19 चे किमान मृत्यूची नोंद केली आहे. आता “Safe Travel Guaranteed” मोहिमेअंतर्गत पर्यटकांना दौऱ्यादरम्यान कोरोनाची लागण झाल्यास वैद्यकीय खर्च सरकार भरणार असल्याने देश अधिक पर्यटकांच्या भेटीची अपेक्षा देश करीत आहे. (Coronavirus Update: जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी च्या पार; अमेरिका, भारतासह सर्वाधिक फटका बसलेल्या Top 5 देशांची यादी पहा)

मंगळवारी उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्झिओयोएव यांनी या हुकुमावर स्वाक्षरी केल्याची माहिती इनसाइडरने दिली आहे. ब्रिटनमधील उझबेकिस्तानच्या पर्यटन राजदूत सोफी इब्बोटसन यांनी सांगितले की, "पर्यटकांना आम्ही उझबेकिस्तानला येऊ शकतात खात्री देऊ इच्छितो." “सरकारला इतका विश्वास आहे की पर्यटन क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या नवीन सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उपायांमुळे पर्यटकांना कोविड-19 पासून संरक्षण मिळेल. राष्ट्रपतींनी जाहीर केले की जर तुम्हाला उझबेकिस्तानमध्ये सुट्टीच्या दिवशी कोरोना झाल्यास आम्ही तुम्हाला भरपाई देऊ."

दरम्यान, शासनाकडून 3,000 डॉलर्स प्राप्त करण्यासाठी प्रवाश्यांनी स्थानिक फेरफटका मार्गदर्शकासह देशात प्रवास केले पाहिजे. स्थानिक टूर मार्गदर्शक, राहण्याची सोय आणि पर्यटन स्थळांना त्याद्वारे सुरक्षा आणि सेनेटरी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करीत असल्याचे दर्शविलेले सरकारी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. Lonely Planet च्या वृत्तानुसार उझबेकिस्तानने आतापर्यंत चीन, इस्त्राईल, जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या कमी जोखमीच्या देशांतील पर्यटक भेट देऊ शकतात, तर युके आणि युरोपमधील पर्यटकांनी तेथे येताना 14 दिवस अलग ठेवणे आवश्यक असल्याची घोषणा केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now