Coronavirus: जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 90 लाखांच्या पार; 4,71,591 मृत्यू
जगभात कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 10 हजारांहून अधिक असलेल्यांमध्ये इंग्लंड (42,731), इटली (34,657), फ्रान्स (29,666), स्पेन (28,324), मैक्सिको (22,584) आणि भारत (13,699) या देशांचा समावेश आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची जगभारातील संख्या आता जवळपास एक कोटीच्या घरात जाते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. जॉन्स हॉपकिंन्स युनिवर्सिटीने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जगभरातील संख्या ही 90 लाखांच्याही पुढे गेली आहे. तर मृत्यू झालेल्यांच्या संख्येनेही 471,000 चा आकडा पार केला आहे. जॉन्स हॉपकिंन्स युनिवर्सिटी संचलीत सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (CSSE) जगभरातील कोरोना संक्रमित रुग्ण आणि मत्यूची आकडेवरी दररोज जाहीर करते. त्यानुसार कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा जगभरातील मंगळवारी आकडा 90,73,386 तर मृत्यू झालेल्यांची संख्या 4,71,591 इतकी झाली आहे.
सीएसएसआयने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरस संक्रमित सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 2,310,786 इतकी तर मृत्यू झालेल्यांची संख्या ही 120,393 इतकी झाली आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राजिल देशात कोरोना संक्रमित रुग्ण अधिक आहेत. ब्राजिलमधील रुग्णांची संख्या 1,106,470 तर मृत्यू झालेल्यांची संख्या 51,271 इतकी आहे. (एका दिवसात जगभरात किती रुग्ण वाढले घ्या जाणून...)
जगभरातील देशांची कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी
- अमेरिका - 2,310,786
- ब्राझिल-1,106,470
- रशिया-591,465
- भारत- 4,25,282
- इंग्लंड- 306,761
- पेरू- 257,447
- चिली- 2,46,963
- स्पेन- 2,46,504
- इटली- 2,38,720
- ईरान- 2,07,525
- फ्रांस- 1,97,381
- जर्मनी- 1,91,768
- तुर्की- 1,88,897
- मेक्सिको-1,85,122
- पाकिस्तान- 1,81,088
- सऊदी अरब -1,61,005
- बांग्लादेश- 1,15,786
- कॅनडा- 1,03,418)
- दक्षिण अफ्रीका- 1,01,590
जगभात कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 10 हजारांहून अधिक असलेल्यांमध्ये इंग्लंड (42,731), इटली (34,657), फ्रान्स (29,666), स्पेन (28,324), मैक्सिको (22,584) आणि भारत (13,699) या देशांचा समावेश आहे.