Coronavirus: एक महिन्यासाठी सिंगापूर लॉकडाऊन; पंतप्रधान हसेन लूंग यांची घोषणा

जनतेला अवाहन आहे की, आवश्यक तेवढ्याच वस्तू खरेदी करा. आगोदर त्यांना द्या ज्यांच्या जवळ नाही. गर्दी करणं कोणत्याही स्थितीत टाळा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Singapore City | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

जगभरातील देशांप्रमाणे सिंगापूर ( Singapore) सुद्दा लॉकडाऊन (Lockdown) होणार आहे. सिंगापूरचे पंतप्रधान हसेन लूंग (Prime Minister Lee Hsien) यांनी जाहीर केल्यानुसार सिंगापूरमध्ये 7 एप्रिलपासून पुढे एक महिना लॉकडाऊन लागू होणार आहे. लॉकडाऊन काळात सिंगापूर येथील सर्व बाजारपेठा आणि नागरी व्यवहार यंत्रणा बंद राहतील. अपवाद केवळ अत्यावश्यक सेवांचा. लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर लगेच एक दिवसानंतर सिंगापूरमधील सर्व शाळा होम बेस्ड एज्युकेशन प्रणाली लागू करतील. कोरोना व्हायरस सायकल तोडण्याच्या हेतुने सिंगापूर सरकार प्रयत्न करत आहे.

सिंगापूरमध्ये पुढचे एक महिना प्रमुख आर्थिक क्षेत्र, आत्यावश्यक सेवा जसे की ग्रॉसरी शॉप, सुपरमार्केट्स, बँकिंग, वाहतूक, क्लीनिक आणि मोठी रुग्णालयं सुरु राहतील. त्याशिवाय इतर सर्व यंत्रणा बंद राहणार आहे. सिंगापूरचे पंतप्रधान हसेन लूंग यांनी सांगितले की, आम्ही Covid-19 आउटब्रेक झाल्यानंतर सातत्याने प्रयत्न करत आहोत की, त्यावर नियंत्रण मिळेल.

पुढे बोलताना  हसेन लूंग यानी म्हटले आहे की, मी जनतेला विश्वास देऊ इच्छितो की, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम सुरु राहील. जनतेला अवाहन आहे की, आवश्यक तेवढ्याच वस्तू खरेदी करा. आगोदर त्यांना द्या ज्यांच्या जवळ नाही. गर्दी करणं कोणत्याही स्थितीत टाळा, असेही त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: इस्त्राईलचे आरोग्यमंत्री याकोव लित्जमैन यांना कोरोना व्हायरस संक्रमन)

एएनआय ट्विट

सिंगापूर सरकारने लोकांना सांगितले की, जे लोक आरोग्यसंपन्न आहेत त्यांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. कारन अद्याप कम्युनिटी स्प्रेड नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि सातत्याने सुधारते आहे. 5 एप्रिल पासून सिंगापर सरकार प्रत्येक घरात रीयूजेबल मास्क पोहोचवणार आहे. सिंगापूरमध्ये शुक्रवारपर्यंत Covid-19 च्या 65 नवे रुग्ण पुढे आले आहेत. यात काही विदेशातून आलेल्या नागरिकांचाही समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार सिंगापूरमध्ये आजघडीला कोरोना बाधितांची संख्या 1100 पेक्षाही अधिक आहे.