Pakistan: Coronavirus मदत निधीत 1 रुपयांच्या बदल्यात सरकारकडून नागरिकांना 4 रुपयांचा परतावा: इमरान खान
इमरान खान यांनी म्हटले आहे की, नागरिकांनी कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी दिलेल्या योगदानाला सरकार कधीही विसरणार नाही. नागरिकांनी या निधीसाठी जर एक रुपया दिला तर, सरकार त्याच्या बदल्यात 4 रुपयांचा परतावा देईल.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) महाममारीविरुद्ध लढण्यासाठी तयार केलेल्या निधीत (Coronavirus Relief Fund) मदत करण्याबाबत नागरिकांना अवाहन केले आहे. इमरान खान यांनी म्हटले आहे की, नागरिकांनी कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी दिलेल्या योगदानाला सरकार कधीही विसरणार नाही. नागरिकांनी या निधीसाठी जर एक रुपया दिला तर, सरकार त्याच्या बदल्यात 4 रुपयांचा परतावा देईल.
इमरान खान यांनी आपल्या मंत्र्यांसोबत गुरुवारी एक बैठक घेतली. या वेळी त्यांनी एक रुपयाच्या बदल्यात नागरिकांना चार रुपयांचा परतावा देण्याची माहिती दिली. इमरान खान यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस रिलीफ फंडाचा वापर त्या लोकांसाठी प्रामुख्याने केला जाईल, जे या आजाराने त्रस्त आहेत. कोरोना व्हायरस संकटात मदत करण्यासाठी लवकरच एक एसएमएस सेवाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच, बेरोजगार तरुणांना बेरोजगार असल्याबाबतचे प्रमाणपत्रही दिले जाईल, असेही खान म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus Crisis: जगभरातील 1.6 अब्ज कामगार बेरोजगार होण्याच्या मार्गावर; कोट्यवधी व्यवसाय होऊ शकतात बंद, ILO ने व्यक्त केली भीती)
इमरान खान यांनी सांगितले की, देशात कोरोना व्हायरसबाबत जी भीती व्यक्त केली जात होती, तितकाच मृत्यू दर दिसत आहे. आम्हाला भीती वाटत होते की, कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग भरले जातील पण, सुदैवाने तसे घडले नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. लवकरच त्यावर यश मिळवण्यात येईल. विदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तान सरकार जगभरातील देशांशी संपर्क करुन लवकरच त्याबबत पावले टाकेन असेही, इमरान यांनी म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2020 11:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

